केंद्रीय राजकारणातून एक मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. देशाच्या सध्याचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अर्जून राम मेघवाल यांची कायदा मंत्री म्हणून वर्णी लागलेली आहे. ( Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as the Law Minister Rijijiu assigned Ministry of Earth Sciences )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रिजिजूंना ते विधान भोवलं?
किरेन रिजिजू यांनी मागील काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती आणि कॉलेजियम व्यवस्थेविरुद्ध केलेली वक्तव्ये यामुळे मोदी सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांची हीच वक्तव्ये त्यांना भोवली असून त्यामुळेच त्यांना कायदा मंत्री पदावरुन दूर केल्याचे बोलले जात आहे.
Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as the Law Minister. Rijijiu assigned the Ministry of Earth Sciences pic.twitter.com/0chlEZG9un
— ANI (@ANI) May 18, 2023
Kiren Rijiju :
Not Law
Now Minister for Earth SciencesNot easy to understand the science behind the Laws
Now will try to grapple with the laws of science
Good luck my friend !
— Kapil Sibal (@KapilSibal) May 18, 2023
मेघवाल यांच्या नियुक्तीमागे राजकीय गणिते?
दुसरीकडे रिजिजू यांच्या जागी अर्जून राम मेघवाल यांची नियुक्ती केल्याने या बदलामागे काही राजकीय गणित असल्याचेही बोलले जात आहे. याचे कारण अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित आहेत. त्यामुळे राजस्थानच्या येत्या निवडणुकीच्या तोंडावर हा बदल केल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगत आहे.
अर्जुन राम मेघवाल हे सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. तर, किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा पोर्टफोलिओ सोपवला जाईल, असी माहिती राष्ट्रपती भवनकडून देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार 25 हजार रुपये मानधन, शिंदे सरकारचा निर्णय!!
– ‘किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; तळेगाव दाभाडे शहरात भव्य मोर्चा । Kishor Aware Murder Case