मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळ असलेल्या कुंडमळा येथील पर्यटनस्थळी तरुण वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. मावळमधील कुंडमळा इथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र अतिउत्साह आणि स्टंटच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. अशीच एक घटना शुक्रवारी (दिनांक 7 जुलै ) रोजी घडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ओमकार बाळासाहेब गायकवाड (वय 24 वर्षे) असे कुंडमळा इथे इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी ओमकार आणि त्याचे मित्र कुंडमळा परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते. तेव्हा कुंडमाळ्याच्या बंधाऱ्यावरून चालत असताना ओमकार गायकवाडचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ( a 24 year old tourist youth washed away in indrayani river at kundmala spot maval taluka )
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र, पोलिस दल त्याचा शोध घेत आहेत परंतू अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. याच दरम्यान ओमकारचा आणि त्याच्या मित्राचा शेवटचा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होतोय.
अधिक वाचा –
– लोणावळा पोलिस स्वयंसेवक दलाची स्थापना, तुम्हीही होऊ शकता स्वयंसेवक, अशी करा नोंदणी
– इंद्रायणीच्या डोहात सापडलेल्या नवविवाहितेच्या मृत्यूचे गुढ उकलले! नवराच निघाला आरोपी…
– आंध्रप्रदेशातून 400 किलो गांजाची तस्करी करताना पळून आलेला मुख्य तस्कर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– आरपीआय आणि संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पवनानगरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभ