व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Vadgaon Maval : नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या हस्ते वडगावात १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या मागील कार्यकाळात आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या माध्यमातून ही सर्व कामे मंजूर करण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 13, 2026
in लोकल, शहर
Aboli Dhore lays foundation stone for various development works in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत उपलब्ध निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील काही प्रभागांत होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ करण्यात आला आहे.

याप्रसंगी नगराध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक प्रवीण चव्हाण, नगरसेविका वैशालीताई सोनवणे, नगरसेविका राणी म्हाळसकर, नगरसेविका सारिका चव्हाण, नगरसेवक अजय भवार, नगरसेवक अनंता कुडे, नगरसेवक रोहित धडवले, माजी नगरसेवक किरण म्हाळसकर, अर्चना ढोरे, गौतम सोनवणे, संपत म्हाळसकर, नितीन कुडे, संतोष म्हाळसकर, यशवंत शिंदे, बाळू तुमकर, दिपक कुडे, प्रशांत चव्हाण आणि विविध विकासकामे करणारे ठेकेदार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपलब्ध निधीतून प्रभाग क्रमांक ०३ मधील केशवनगर कमान ते बाळासाहेब तुमकर यांच्या निवासनापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण व बंदिस्त गटर करणे, प्रभाग क्रमांक ९ मधील चिंचेचा गणपती ते बाळू कदम यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्रमांक १५ मधील सहवास सोसायटी रस्ता बीएम व बीसी करणे, ठाकरवाडी अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, श्री. देसाई घर ते राव प्रॉपर्टी रस्ता डांबरीकरण करणे, हायवे ते प्रविण चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक १७ छत्रपती संभाजी महाराज नगर मधील शुभम सिद्धी, नंदनवन बिल्डिंग ते हँगिंग गार्डन बिल्डिंग पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक १७ येथील सर्वे नंबर ७७ येथील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाकरिता रस्ते विकसित करणे इ. विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ होऊन काही परिसरात देखील प्रत्यक्षात अनेक विकासकामांना देखील सुरुवात करण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या मागील कार्यकाळात आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या माध्यमातून ही सर्व कामे मंजूर करण्यात आली होती. गेल्याच महिन्यापूर्वी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अबोली ढोरे यांच्या या नूतन कालावधीत या सर्व विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या सर्व विकासकामांसाठी तब्बल १ कोटी ५० लक्ष रुपये इतका भरीव निधी उपलब्ध झाल्याने खूप वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक रस्त्यांचे विषय मार्गी लागत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या होत असलेल्या विकासकामांसाठी नेमलेल्या संबंधित ठेकेदारांना सदरची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिल्या.

येणाऱ्या काळात आमदार साहेबांच्या माध्यमातून वडगाव कातवीच्या सर्वांगीण विकासासाठी अजून भरीव निधी उपलब्ध होणार आहे. आज प्रथमता ज्या ज्या प्रभागांमध्ये ही विकास कामे होत आहेत, त्या त्या प्रभागांतील सन्माननीय नगरसेवकांनी नव्याने होणारी हि विकासकामे दर्जेदार पद्धतीने करून घेण्यासाठी जातीने लक्ष देऊन पुढाकार घ्यावा अशा सूचना सर्वांना नगराध्यक्षांनी केल्या.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर
– जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा
– वडगावात स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात मंगळवारी स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान

Next Post

“महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने वडगावची भूमी पावन झाली, ऐतिहासिक वडगाव शहराचा इतिहास लिहिला जावा”

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lecture by senior writer Prabhakar Oval on Equality and Brotherhood in Society concluded at Vadgaon Nagar Panchayat

"महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने वडगावची भूमी पावन झाली, ऐतिहासिक वडगाव शहराचा इतिहास लिहिला जावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.