व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पूनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे त्यांच्या जगण्यावर बुलडोजर फिरविणे – आमदार सुनील शेळके

धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची घरं-दुकानं तोडू नका ; आमदार सुनील शेळके यांची सरकारकडे नागपूर अधिवेशनात ठाम मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 11, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
action against farmers who have not been rehabilitated means turning bulldozer on their livelihood MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आंद्रा, पवना, जाधववाडी आणि कासारसाई या राज्य सरकारच्या धरणांच्या भोवताली गेल्या ४०–४५ वर्षांपासून स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांनी आपले जगणे टिकवण्यासाठी लहान–मोठे व्यवसाय उभे केले आहेत. अनेकांच्या जमिनी धरण प्रकल्पांमध्ये गेल्या, भूसंपादन झाले ; मात्र आजतागायत त्यांचे पुनर्वसन झालेले नाही.

अशा परिस्थितीत जलसंपदा विभागाने धरण परिसरातील घरांवर व व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिकांचा रोजगार धोक्यात आला असून अनेक दुकानं–घरे तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गंभीर मुद्द्यावर आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेच्या सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली.

पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे त्यांच्या जगण्यावर बुलडोझर फिरवल्यासारखे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. धरणासाठी स्वतःची जमीन देऊनही शासनाकडून न्याय न मिळालेल्या शेतकरी बांधवांना विश्वासात घेणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“संबंधित विभागाने धरण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची भाषा करणे समजू शकते ; परंतु ज्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी धरणासाठी दिल्या आणि अजूनही पुनर्वसनाची वाट पाहत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या घरांवर, दुकानांवर बुलडोझर चालू नये,” अशी मागणी आमदार शेळके यांनी सभागृहात केली. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शासनाने कायदेशीर कारवाई करावी, असा ठाम आग्रह त्यांनी व्यक्त केला.

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे रोजीरोटीचे स्रोत असलेल्या या लहान–मोठ्या व्यवसायांचे संरक्षण करणे आणि त्यांना न्याय देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शासनाने तातडीने पुनर्वसनाचा मुद्दा सोडवावा आणि कारवाई करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचे हक्क सुरक्षित करावेत, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार
– लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
– इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान
– नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात


dainik maval jahirat

Previous Post

Bhausaheb Gund । काले-कुसगांव जिल्हा परिषद गट : प्रभावी उमेदवार म्हणून भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा

Next Post

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे ; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Work on 220 projects in Pune metropolitan area CM Devendra Fadnavis

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे ; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.