व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाची महत्वाची बैठक आज (बुधवार, 22 फेब्रुवारी) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
Maharshtra-Mantralay

Photo Courtesy : Twitter / MahaDGIPR


महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाची महत्वाची बैठक आज (बुधवार, 22 फेब्रुवारी) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख मंत्री, अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यापुर्वी दिवाळीतही शिंदे-फडणवीस सरकारने गरीब जनतेसाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. यासह इतरही अनेक महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत. ( Anandacha Shidha Ration In Hundred Rupees For Poor People Maharashtra Shinde Fadanvis Government Big Decisions In Cabinet Meeting )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

#मंत्रिमंडळनिर्णय
✅ अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार. ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ

✅ गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा. १ कोटी ६३ लाख शिधापत्रिका धारकांना लाभ

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 22, 2023

 

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

अधिक वाचा –

– पोटनिवडणुकीत झोकून देवून काम करा, एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश
– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री शिंदेंची एन्ट्री, बुधवारी रोड शोसह होणार जाहीर सभा, वाचा अधिक


Previous Post

पोटनिवडणुकीत झोकून देवून काम करा, एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश

Next Post

‘मनरेगा’तून उभारले सार्वजनिक गोदाम, मावळमधील ‘आढे पॅटर्न’ची जिल्ह्यात चर्चा, आमदार-खासदार यांच्या हस्ते उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Public-Godown-Under-MGNREGA

'मनरेगा'तून उभारले सार्वजनिक गोदाम, मावळमधील 'आढे पॅटर्न'ची जिल्ह्यात चर्चा, आमदार-खासदार यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Last rites of former Maval MLA Krishnarao Bhegde

माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन ! जनसामान्यांच्या असामान्य नेतृत्वास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

July 1, 2025
DCM Ajit Pawar pays emotional tribute to former Maval MLA Krishnarao Bhegde

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

July 1, 2025
Never-seen photos of Krishnarao Bhegde See only on Dainik Maval Krishnarao Bhegde Passes Away

“कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away

July 1, 2025
Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

June 30, 2025
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.