मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भारत काळे यांची एकमताने बिनविरोध झाली. तर कार्यकारी संचालकपदी राम कदमबांडे, उपाध्यक्ष पदी अशोक कराड, खजिनदार पदी भाऊसाहेब खोसे निवड करण्यात आली. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था यांची 2023- 2028 संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर वडगाव येथील सहकार निबंधक कार्यालयात पदाधिकारी निवड घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि खजिनदार पदासाठी एक एकच अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना तळपे, सहाय्यक राकेश निखारे, मंदार कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी जेष्ठ संचालक धनकुमार शिंदे, दिलीप पोटे, वैजयंती कुल सुमन जाधव, सोपान असवले, रियाज तांबोळी, विजय वरघडे, दत्तात्रय गायकवाड, अमोल जाधव आदी संचालक उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक विलास भेगडे, मुख्य प्रवर्तक धनंजय नांगरे, सल्लागार भाऊसाहेब आगळमे, पांडुरंग ठाकर, नारायण असवले यांनी विशेष प्रयत्न केले. निवडीनंतर बोलताना भारत काळे म्हणाले की, मावळ तालुक्यातील अग्रेसर असणारी पतसंस्था असून पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन पतसंस्था आणि सभासदांचे हिताचे निर्णय घेतले जातील.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंना कलाकार चाहत्याकडून भन्नाट गिफ्ट; भेट पाहून ‘आण्णा’ही भावूक
– वडगाव शहरात भाजपातर्फे मतदार नोंदणी अभियान; पाहा शहरात कधी आणि कुठे होणार शिबिर?
– पाणी योजनांसाठी जागा उपलब्ध होत नसलेल्या 13 गावांतील गावकऱ्यांना आमदार सुनिल शेळकेंचे जाहीर आवाहन, वाचा