शिवाजी पार्क मैदानावर ( Shivaji Park Dadar ) दसरा मेळावा ( Dussehra Rally ) घेण्यावरुन शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातीलच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गट आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गट हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी आग्रह धरण्यात आला आणि पालिकेकडे अर्ज करण्यात आला. मात्र, मुंबई पालिकेने ( Mumbai ) कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावाकरिता परवानगी नाकारली. अखेर हा तिढा कोर्टात गेला, जिथे आता मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) उद्धव ठाकरे गटाला दिलासा तर एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका दिला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पालिकेने परवानगी नाकारल्यानंतर दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून आधी उद्धव ठाकरे गट आणि नंतर एकनाथ शिंदे गट दोन्ही पक्षकारांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यावर आज (शुक्रवार, 23 सप्टेंबर) रोजी हायकोर्टात सुनावणी झाली. सर्व पक्षकारांची भुमिका ऐकूण घेतल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला.
सत्यमेव जयते!
आपला दसरा हा शिवतीर्थावरच!
विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय!
सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार ????????
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2022
सत्यमेव जयते
????⛳⛳???? pic.twitter.com/oq81IkcVMP— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 23, 2022
शिवाजी पार्कवर आवाज उद्धव ठाकरेंचाच – कोर्टाची परवानगी
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकूण घेतल्यानंतर दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या गटाला परवानगी दिली आहे. त्यामुळे परंपरेनुसार चालत आलेल्या या दसरा मेळाव्यात यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच तोफ धडाडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. ( Bombay High Court Allows Uddhav Thackeray led Shiv Sena To Hold Dussehra Rally At Shivaji Park Dadar )
अधिक वाचा –
Video : भव्य जनआक्रोश रॅली, आदित्य ठाकरे वडगावात येणार, आंदोलनाचा जबरदस्त टीझर, एकदा पाहाच
तब्बल 22 वर्षांच्या लढ्याला यश..! शिरे-शेटेवाडी गावातील 105 कुटुंबाचे पुनर्वसन होणार
View this post on Instagram