Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर, इंदुरी (सुदवडी) या पवित्र तीर्थक्षेत्राखालून सुरूंगाद्वारे प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्ग जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- हे स्थान संत तुकाराम महाराज यांची कर्मभूमी असून, महाराष्ट्र व देशभरातील वारकरी संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि सध्या येथे एक भव्य मंदिर उभारले जात आहे.
या पार्श्वभूमीवर, ट्रस्ट, वारकरी संप्रदाय व स्थानिक ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन या पवित्र स्थळाच्या खाली कोणतेही काम होऊ नये, अशी मागणी केंद्रीय रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
याबाबत मंगळवारी (दि. २० मे) दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अश्विनी वैष्णव यांनीही निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी संबधित विभागांकडून अहवाल मागवण्याचे आश्वासन दिले असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News