व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नववर्षानिमित्त पवना डॅम, लोणावळा परिसरातील वाहतूक मार्गात बदल – पाहा कोणता रस्ता सुरू, कोणता बंद

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 31, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नववर्षानिमित्त पवना डॅम आणि लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत सुरक्षिततेच्यादृष्टीने पर्यटनस्थळ परिसरात ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.

पुणे मुंबई, कामशेतकडे येणाऱ्या वाहने पवनानगर बाजारपेठेत बंदी घालण्यात येत असून येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुणे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली फाटा मार्गे जवन रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वाहतूक वळविण्यात येत आहे. परंतु, पवना नगर, कालेगाव, आंबेगाव, शिदगाव, पाले, धामनधरा, दुधीवरे बाजुस जाणारी वाहने तसेच जड,अवजड वाहने सोडण्यात येतील.

येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे)-कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुर्णे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतुक करण्यात येत आहे. मौजे ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थानिक रहिवाशांना येळसे बाजुकडे येण्यास बंदी करण्यात आली असून, वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पुल-कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे येळसे कामशेत असे जाता येईल. पवनानगर बाजारातपेठेत वाहतूक कोंडी होवू नये म्हणून जड,अवजड वाहनांना जाण्यास बंदी करण्यात येत आहे.

१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तुंग, मोरवे, चवसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकुरसाई, फांगणेकडून पवनानगर, कामशेतकडे जाणारी वाहने काले कॉलनी पवनानगरकडे जाण्यास मनाई करण्यात आली असून ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ-मळवंडी,कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे-कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून डावीकडे येळसेबाजुकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा मार्गे मुंबई पुणे, कामशेत कडे वळविण्यात येत आहे. परंतु, पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड, अवजड वाहनांना सोडण्यात येईल.

ब्राम्हणोलीफाटा उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजुकडे) येळसे प्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. वारु ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाश्यांनी पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात येत असून, वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ, अशी या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असेही आदेश जारी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


Previous Post

कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट

Next Post

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिनांक एक ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यभर ‘रस्ता सुरक्षा अभियान’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
road-safety

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिनांक एक ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यभर 'रस्ता सुरक्षा अभियान'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.