व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध करणार’, कुणी केलीये मागणी? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजासंदर्भात केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 5, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Chhagan-Bhujbal

Photo Courtesy : Team Dainik Maval


अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजासंदर्भात केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाभिक समाजाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये’ असे वादग्रस्त आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. यावर राज्यभारतील नाभिक समाजाकडून आक्षेप नोंदवून निषेध व्यक्त केला जात आहे. भुजबळ यांनी माफी मागितली नाही, तर राज्यभरात निषेध आंदोलन करण्याचा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला. ( Chhagan Bhujbal should apologize demand By Nabhik Samaj Read in detail )

रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, “मीदेखील ओबीसी समाजाचाच भाग आहे. छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी लढत आहेत. ही लढाई लढत असताना त्यांनी ओबीसी समाजातील जातींचा सन्मानपूर्वक उल्लेख करावा. कुणाचीही अस्मिता दुखावली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. न्हावी या शब्दाऐवजी नाभिक असा उल्लेख भुजबळ यांनी करायला हवा होता. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावीत.”

“नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय हा सर्व समाजाची सेवा करून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. सर्व जाती आणि धर्मातील लोकांची हजामत करून, सेवा करून त्याद्वारे नाभिक समाज बांधव रोजीरोटी कमावतात. त्यामुळे समाज बांधवांनी भुजबळांचे ऐकून कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकून व्यवसायात अडथळा निर्माण करून घेऊ नये. भुजबळ यांनी इथून पुढे बोलताना तारतम्य बाळगावे. कोणाच्या तरी स्क्रिप्टनुसार भाषणबाजी करू नये, अन्यथा त्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा –
– ‘राज्यभर नमो महारोजगार मेळावे, मुंबईत मालमत्ता कर वाढ नाही ते पतसंस्थांना मजबूत करणार’, शिंदे सरकारचे मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर
– संजोग वाघेरे यांचा बुधवारी पवन मावळ दौरा, गडपूजनाने होणार सुरुवात, पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद । Sanjog Waghere Maval Lok Sabha
– छत्रपती शिवरायांना मुजरा अन् जरांगे पाटलांना धन्यवाद! मावळातील युवकाने दिलेल्या जगावेगळ्या शुभेच्छांची राज्यभर चर्चा


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील ‘या’ 10 गावात अंगणवाडी इमारतीसाठी निधी उपलब्ध; 11 अंगणवाड्यांसाठी तब्बल 1 कोटी 23 लाखांचा निधी, वाचा सविस्तर । Maval News

Next Post

मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक : अवैध उमेदवारी अर्ज आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेबाबत महायुतीच्या नेत्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-kharedi-vikri-sangh

मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक : अवैध उमेदवारी अर्ज आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेबाबत महायुतीच्या नेत्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.