व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सर्वधर्मीय संविधान रॅलीला नागरिकांना उदंड प्रतिसाद ; लोणावळ्यात घडले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन । Lonavala News

लोणावळा येथे रविवारी (दि. १६ फेब्रुवारी) रोजी भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 17, 2025
in शहर, लोकल
Citizens response to All Religious Constitution Rally vision of national unity took place in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा येथे रविवारी (दि. १६ फेब्रुवारी) रोजी भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी लोणावळा शहरातील सर्व जातीधर्माच्या तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन भव्य संविधान मिरवणूक काढली. तसेच जाहीर सभेत संविधानाच्या ७५ प्रती लोणावळ्यातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या धर्मगुरूंना, सर्व पक्षांच्या प्रमुखांना, शाळा काॅलेज आणि शासकीय अधिकाऱ्यांना बौद्ध भिक्खूच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणावळा शहरांमध्ये सर्व धर्मीय संविधान रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला सर्व धर्मीय धर्मगुरू सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष व सर्व धर्मीय नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. विविध शाळांमधील विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रथामधून संविधान प्रतीची मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रम स्थळी सर्व महापुरुषांचे पुतळे व समूह शिल्पांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

संविधान गौरव समितीच्या वतीने लोणावळा शहरांमधील शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच शाळा व विविध संस्था, संघटना यांना 75 संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आले आहेत. सर्व धर्मीय धर्मगुरू व सर्व धर्मीय प्रतिनिधी यांनी यावेळी व्यासपीठावरून संविधानाबाबत आपल्या भूमिका स्पष्ट करत संविधान जनजागृतीसाठी कायमस्वरूपी उपक्रम राबवण्याबाबतचा मानस व्यक्‍त केला.

भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान मसुदा समितीच्या वतीने संविधान तयार करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सदर संविधानाचा मसुदा तयार करत तो पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे सुपूर्द केला. या संविधानाच्या तत्त्वावर भारतीय राज्यघटना, भारतीय न्यायव्यवस्था, भारतीय सामाजिक व्यवस्था, समता व बंधुत्व, या व्यवस्था काम करत आहेत. प्रत्येक घटकाला या संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका विशद करण्यात आली आहे. अशा या संविधानाबाबत प्रत्येकाला माहिती असावी, संविधानाने दिलेले अधिकार व मूलभूत कर्तव्य ही प्रत्येकाला समजावी याकरिता संविधान गौरव समितीच्या वतीने येणाऱ्या काळात देखील संविधान जनजागृती अभियान राबवले जाणार असल्याचे सूर्यकांत वाघमारे व दत्तात्रेय येवले यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल, सुदुंबरे येथील घटना । Maval Crime

Next Post

किल्ले लोहगड येथे दीपवंदनेतून स्व. शिरीष महाराज मोरे यांना श्रद्धांजली । Pavan Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tribute meeting to late Shirish Maharaj More at Fort Lohgad

किल्ले लोहगड येथे दीपवंदनेतून स्व. शिरीष महाराज मोरे यांना श्रद्धांजली । Pavan Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.