व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत दिव्यांग कल्याण निधी वितरण ; २८३ लाभार्थ्यांना ९० लाखांचा प्रारूप धनादेश वाटप । Talegaon Dabhade

दिव्यांग सक्षमीकरणाला चालना देणे ही सामूहिक जबाबदारी - आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 1, 2025
in लोकल, शहर
Divyang Welfare Fund Distribution in Talegaon Dabhade Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग असून, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन दिव्यांगांसाठी संधी निर्माण केल्या तरच त्यांच्या विकासाचा खरा अर्थ साधता येईल, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.

  • तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे दिव्यांग कल्याण निधी व सानुग्रह अनुदान वितरणाचा कार्यक्रम शनिवारी (३१ मे) नगर परिषद कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात आमदार शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

वित्तीय वर्ष २०२५-२६ साठी प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी दिव्यांग प्रतिनिधी छाननी समितीमार्फत करण्यात आली. त्यानुसार पात्र ठरलेल्या एकूण २८३ UDID कार्डधारक लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना एकूण ९० लाख रुपयांच्या निधीचा प्रारूप धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आला.

  • या कार्यक्रमात आमदार शेळके यांनी पुढे बोलताना सांगितले की, “दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर सक्षमपणे जगण्यासाठी संधी व आधार देणं गरजेचं आहे. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशासनाने सातत्याने अशा योजनांची अंमलबजावणी करत राहावी.”

कार्यक्रमाला मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, दिव्यांग संघटनेचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगर परिषद प्रशासनाच्यावतीने सर्व मान्यवर, लाभार्थी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नगर परिषदेचे आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : पुण्यात मद्यपी वाहन चालकाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवले, बारा जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल । Pune News

Next Post

देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड । Dehu Nagar Panchayat

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Priyanka More elected unopposed as Deputy Mayor of Dehu Nagar Panchayat

देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड । Dehu Nagar Panchayat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.