मावळ तालुक्यातील ( Maval News ) मौजे बेबडओहळ येथे रस्त्यावर खडी टाकल्याच्या कारणावरुन एका 70 वर्षीय वृद्धाला तलवारीचा धाक दाखवून मारहाण करण्याचा प्रयत्न ( Maval Crime ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी फिर्यादी भालचंद्र हरीभाऊ भालेराव (वय 70, रा. बेबडओव्हळ ता मावळ जि पुणे) यांनी शिरगाव पोलिसांत ( Shirgaon Police Station ) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विनोद रमेश गायकवाड (वय 45 वर्षे, रा. बेबडओव्हळ ता मावळ जि पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिरगाव पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 504, 506 भा. ह. कायदा कलम 4 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ( Elderly Man Attacked With Sword At Bebadohal Village Case Registered Shirgaon Parandwadi Police Station )
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मौजे बेबडओहळ (तालुका मावळ जिल्हा पुणे) इथे फिर्यादी भालचंद्र हरीभाऊ भालेराव हे त्यांच्या राहत्या घरासमोर दुचाकी वाहन धुवत असताना, आरोपी विनोद रमेश गायकवाड तिथे आला. त्याने भालचंद्र भालेराव यांना रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला घरी जा म्हणून सांगितले.
मात्र, आरोपीने राग मनात धरून घरी जात घरातून तलवार सदृश्य हत्यार घेऊन पुन्हा शिवीगाळ करत भालचंद्र भालेराव यांच्या घरी आला. तसेच, हातातील तलवार सदृश्य हत्यार घेऊन दोनदा भालेराव यांना मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकरणी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिस हवालदार वाडीले हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊ गावातील गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक
– ‘मनरेगा’तून उभारले सार्वजनिक गोदाम, मावळमधील ‘आढे पॅटर्न’ची जिल्ह्यात चर्चा, आमदार-खासदार यांच्या हस्ते उद्घाटन