प्रख्यात लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू याने आपले आयुष्य संपवले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबूने आत्महत्या केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा इथे ही घटना घडली. सोमवारी (दि. 2 ऑक्टोबर) संध्याकाळी ही घटना समोर आली. डेबू हा आयटी इंजिनिअर तरुण होता. इतक्या कमी वयात डेबूने हा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. डेबूने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपल्या मृत्यूचे कारण नमूद केले आहे. ( Famous Writer Rajan Khan Son Debu Suicide At Maval Taluka Pune )
डेबू हा सोमटणे फाटा इथे एकटाच राहायचा. सोमवारी सकाळपासून त्याने घराचं दार उघडलेच नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. मग दुपारी घर मालकिणीने डेबूच्या पुण्यात राहणाऱ्या भावाला फोन केला. डेबूच्या भावाने त्यानंतर लगेच डेबूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन केल्यानंतर डेबूने तो फोन घेतला नाही. त्यामुळे भावाने डेबू राहत असललेल्या सोमटणे फाटा इथल्या घरी गेला. घराचे दार ठोठावलं. पण डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही. डेबूच्या भावाने तळेगाव पोलिसांशी संपर्क साधला. थोड्या वेळात पोलिस घरी आले. त्यांनी दार तोडले आणि घरात प्रवेश करताच धक्कादायक बाब समोर आली. बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचे समोर आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत आत्महत्या करण्याचे कारण समोर आले आहे. आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केली. त्यातून मोठा आर्थिक फटका बसल्याचा उल्लेख त्यात केल्याचे समजत आहे. डेबूच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– 40 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; मावळमधील धक्कादायक घटना
– महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election
– कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला यांसह मावळ तालुक्यातील ‘या’ पाणीपुरवठा योजनांसाठी अधिकारी स्तरावर बैठक