अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे दीडशे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जवरेडोली येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. काळुराम शिवाजी बरकडे (मु. वनकुट ता. पारनेर जि. नगर) हे गरीब मेंढपाळ आपल्या बकऱ्यांचा वाडा घेऊन मावळ तालुक्यातील करंडोली, जेवरेवाडी भागात आले असता, तिथे डोंगर भागात चरत असताना त्यांच्या बकऱ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने सुमारे दीडशे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. ह्या आपत्तीत गरीब मेंढपाळाचे सुमारे 20 लाख रूपयाचे नुकसान झाले होते. या आर्थिक संकटातून काळूराम बरकडे यांना सावरता यावे यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सकल मराठा समाजाकडून 25 हजारांची आर्थिक मदत –
सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने सदर मेंढपाळाला 25 हजारांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. सोबतच परिसरातील दानशूर व्यक्तींनी आणि व्यवसायिक मंडळींनी धनगर बांधवाला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचे आवाहन केले आहे.
भाजपाकडून आर्थिक मदत –
गुरुवारी वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात मेंढपाळ संतोष बरकडे यांना पक्षाकडून आर्थिक मदत करण्यात आली. प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे यांनी ही मदत सुपूर्द केली. तसेच शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अभिमन्यू शिंदे, सुनील वरघडे, अभिजीत नाटक, यादव सोरटे आदीजण उपस्थित होते. ( financial help from charitable persons of maval taluka to poor shepherd who lost 150 goats and sheep )
अधिक वाचा –
– गॅस सिलिंडरची अवैधरित्या वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची खैर नाही! अन्नधान्य वितरण विभागाची मोठी कारवाई । Pune Crime
– पुसाणे गावच्या हद्दीत अवैधरित्या गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, दोन तरुणांवर गुन्हा दाखल । Maval Crime
– गुडन्यूज! मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती, अजितदादांच्या आदेशाने ‘हे’ प्रकल्प लागणार मार्गी । Maval News