पवन मावळ भागातील पहिली डिजिटल इंग्रजी माध्यमाची शाळा असलेल्या संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर इथे आता मोबाईल लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. या लायब्ररीचे उद्घाटन गुरुवार (दिनांक 27 जुलै) रोजी करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य सुधारून त्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी ह्या उद्देशाने एस. फॉर स्कूल चेक मुख्य प्रवर्तक चेतन परदेशी अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आणि ही लायब्ररी सुरु करण्यात आली आहे.
चेतन परदेशी यांच्या सहकार्याने आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लायब्ररीच्या उद्घाटन कार्यक्रमाला काले केंद्राचे केंद्रप्रमुख डेंगळे सर, इंडियन नेव्ही मरीन इंजिनिअर ऋषभ महिंद्रकर, ए. व्ही. टेक. उद्योग समूहाचे संचालक वैभव दरावडे, संकल्प इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक राहुल सोनवणे, नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर, वैष्णवी काळे, प्रियांका येवले, सुजाता वाघेरे, आशा बोरकर, निकिता कालेकर, मोना गांधी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. बाळू कदम यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास येवले यांनी आभार मानले. ( first time in maval taluka mobile library launched in sankalp english school pavananagar read about concept )
मोबाईल लायब्ररी म्हणजे…
मोबाईल लायब्ररी ही संकल्पना अत्यंत नवीन आहे. ज्याप्रमाणे मोबाईल क्लिनिक असते, त्याप्रमाणे हि मोबाईल लायब्ररी असते. जवळपासच्या तीन ते चार शाळांमिळून ही संकल्पना राबवली जाते. ह्यात प्रत्येक शाळांना पुस्तकांचा एक संच दिला जातो. त्याहून वेगळ्या पुस्तकांचा संच दुसऱ्या शाळेला, तर तिसऱ्या चौथ्या अशा ग्रुप केलेल्या प्रत्येक शाळेत वेगवेगळी पुस्तके असलेला संच दिला जातो. एक ठराविक कालावधीनंतर ह्याच शाळांमध्ये पुस्तक संचांची अदलाबदल केली जाते. ह्यातून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तके वापरायला मिळतात. तर शाळांनाही शुन्य शुल्कात नवीन पुस्तके उपलब्ध होतात. सध्या पवन मावळातील तीन शाळांत हा उपक्रम राबवला जाणार असून सध्या संकल्प स्कूलला 200 पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत