बुधवार (दिनांक 17 मे) रोजी हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव (दाभाडे) संस्था, युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या उपजीविका व पर्यावरण संवर्धन केंद्रित हरित ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 जवण, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुंग गावात मोफत पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर घेण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी गावातील गाई म्हशी अशा जनावरांची गर्भ तपासणी वंधत्व निवारण करण्यात आले. तसेच विविध आजारांवर मोफत औषध उपचार करण्यात आले. आवश्यकतेनुसार जंतनाशक औषधे पाजणे, घटसर्पचे लसीकरण, दुध वाढीचे औषधांचे वाटप व गोचीड व गोमाशी निर्मूलन करिता औषध उपचार करण्यात आले. याच कार्यक्रमा दरम्यान म्हशीच्या पारडाला सर्प दंश झाला असता पारडाला कॅम्प मार्फत योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. ( Free Veterinary Health Camp at Tung Village Animal husbandry farmers got valuable guidance maval taluka )
कार्यक्रमाला डॉ. परंडवाल अनील पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती मावळ, डॉ. रायकर संजय, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती मावळ. तसेच डॉ. प्रशांत हांडे – पशुधन पर्यवेक्षक, भास्कर माळी, परिचर हे पशुधन कर्मचारी उपस्थित होते. डॉ. परंडवाल अनील, डॉ. रायकर संजय, डॉ. प्रशांत हांडे व हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेचे प्रतिनिधी यांनी दुग्ध व्यवसाय यशस्वी करून आर्थिक उन्नती होण्याकरिता आवश्यक पशुवैद्यकीय शासकीय योजनांची माहिती दिली, त्याचबरोबर विविध आजारावर योग्य मार्गदर्शन केले.
सदर शिबिराला गावातील पशुपालन व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या जनावरांसोबत उपस्थित लावली. हे शिबिर घेतल्याबद्दल कोमल लोहकरे यांनी संस्थेचे व शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. मोफत पशुवैद्यकीय शिबिर तुंग या कार्यक्रमात संस्थेकडून अभिजीत अब्दुले, सारिका शिंदे व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवन मावळमधील रस्त्यासाठी आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून साडेचार कोटींचा निधी; मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
– लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी