व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव एमआयडीसीत ट्रक टर्मिनस उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मिटणार । Maval News

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहराच्या वेशीवरील एमआयडीसीच्या जागेत तळेगाव येथे दोन ट्रक टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Truck Terminus

file image


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहराच्या वेशीवरील एमआयडीसीच्या जागेत तळेगाव येथे दोन ट्रक टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत ते काम पूर्ण होणार असून यामुळे तळेगाव-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकतो. पुणे जिल्ह्यात तळेगाव, चाकण, पिंपरी, रांजणगाव, कारेगाव येथे एमआयडीसी क्षेत्र विकसित झाले आहे. तेथे वाहन निर्मितीसह अनेक लघु आणि मध्यम उद्योग सुरू आहेत. उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालापासून ते उत्पादित पक्क्या मालापर्यंत सर्व वाहतूक ट्रक, कंटेनर, ट्रेलरद्वारे केली जाते. दररोज पाच हजारांवर मालवाहतूक वाहने शहरातून ये-जा करतात.

वाहनचालकांना शहरात येईपर्यंत सकाळ उजाडते किंवा संध्याकाळ होते. पण, शहरात सकाळी आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने शहराबाहेरच किंवा रस्त्याच्या कडेला थांबवावी लागतात. अरुंद रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालक आणि रस्त्यावरील पार्किंग वाहतूक कोंडीस जबाबदार आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव एमआयडीसीत पुष्प संवर्धन केंद्राजवळ नाणोली फाट्यालगत 10 हजार चौरस मीटर जागेवर एक आणि बधालेवाडी-मिंडेवाडी 75 मीटर रस्त्यालगत 40 हजार चौरस मीटर जागेवर दुसरे प्रशस्त ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दोन्ही ट्रक टर्मिनलच्या कामाला मागच्या वर्षी सुरुवात झाली असून सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. तिथे चालकांसाठी प्रशस्त विश्रांतीगृह, स्वच्छतागृह, उपाहारगृह असणार आहे. वाहनांसाठी पार्किंग सुविधा, वाहनांचे सुटे भाग, देखभाल दुरुस्ती करणाऱ्या आस्थापनांसाठी गाळे उभारण्यात येत आहेत.

तळेगाव एमआयडीसीत उभारण्यात येत असलेल्या दोन्ही ट्रक टर्मिनलवर डांबरीकरण आणि प्रशस्त इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ट्रक टर्मिनल चालविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तळेगाव एमआयडीसीमधील दोन्ही ट्रक टर्मिनलची कामे अंतिम टप्प्यात आली असून, तीन-चार महिन्यांत ती कार्यान्वित होतील. यामध्ये चालकांसाठी सुसज्ज आरामकक्ष, कॅन्टीन आणि अवजड वाहनांची पार्किंगची सोय असणार आहे, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड यांनी दिली.

टक्का 1 – पुष्प संवर्धन केंद्र
एकूण जागा – 10 हजार चौरस मीटर
वाहनांची पार्किंग क्षमता – 200 ट्रक
गाळ्यांची संख्या – 8
रेस्ट रूम – 100 चालकांसाठी
एकूण – 4.5 कोटी रुपये

टप्पा 2 – बधालेवाडी-मिंडेवाडी
एकूण जागा – 40 हजार चौरस मीटर
वाहनांची पार्किंग क्षमता – 350 ट्रक
गाळ्यांची संख्या – 12
रेस्ट रूम – 200 चालकांसाठी
एकूण – 15 कोटी रुपये

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार 


dainik maval jahirat

Previous Post

‘अजितदादांनी मंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता…’, सुनिल शेळके यांनी सांगितले मंत्रिपदाचा पत्ता कट होण्याचं खरं कारण

Next Post

थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांवर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची असणार करडी नजर । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
new year and christmas celebration liquor shops hotels and bars will open till 5 am in maharashtra

थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांवर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची असणार करडी नजर । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.