वडगाव मावळ : वडगाव मावळ गावच्या हद्दीत आंबेडकर कॉलनी इथे पत्राच्या शेडमध्ये काही जण जुगार खेळत आहेत, अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास वडगाव मावळ गावच्या हद्दीत आंबेडकर नगरमधील पशुवैद्यकीय दवाखाना शेजारी असलेल्या पत्रा शेडमध्ये छापा टाकवा.
त्यावेळी 1. दिनेश सौदानसिंग चौहान (वय 32 वर्षे, रा. आंबेडकरनगर, वडगाव मावळ) 2. राजेश मारुती तरस (वय 43 वर्षे रा. किवळे ता.हवेली) 3. अंकुश अशोक सुरवडे (वय 33 वर्षे, रा. आंबेडकर नगर वडगाव मावळ) 4. नंदकुमार ढोरे (वय 57, रा. वडगाव मावळ) 5. अविनाश बाळू काजळे (वय. 31 वर्षे रा. नायगाव ता. मावळ) 6. रोहित अशोक ढोरे (वय 24 वर्ष, रा. वडगाव मावळ) 7. अजय कैलास दवणे (वय 27 वर्षे, रा. माऊ ता. मावळ) 8. सागर भानुदास जांभळे (वय 32, रा. माऊ, ता. मावळ) आणि 9. गजानन भिमा बाळशंकर (वय 40, रा. तळेगाव स्टेशन ता. मावळ) ह्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी छापा टाकला असता हे सर्वजण जुगार खेळता आढळून आले. पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता तिथे पत्ते खेळण्याचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहने असा एकूण 6,41,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( IPS Satyasai Karthik raid on gambling den in Vadgaon Maval )
ह्या कारवाईत आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या समवेच पो.ह.वा. नायकुडे, पो.शि. शिंदे, पो.शि. पवार, पो.ह.वा. संजय सुपे, पो.ना. शशिकांत खोपडे, पो.कॉ. अंकुश पाटील यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास म॑. पो.स.ई. आर.आर.मोहिते करत आहेत. आगामी गणेशोत्सव काळात गणपती मंडळातील सदस्य कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा बेकायदेशीर अवैध धंदे करणार नाहीत याबाबत सत्यसाई कार्तिक यांनी सुचना दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळच्या सुपुत्राची यशस्वी कामगिरी! उर्से गावातील नवनीत ठाकूर याची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत निवड
– शिंदे सरकारचे एकापेक्षा एक जबरदस्त निर्णय! फक्त मराठवाडा नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर
– वनविभागाकडून मौजे बोरवली गावात वनराई बंधाऱ्याची निर्मिती; वनराई बंधारा म्हणजे काय? समजून घ्या