मावळ ( Maval ) तालुक्यातील पवनमावळ ( Pavan Maval ) भागात असलेल्या वारू ( Varu Village ) गावात मागील महिनाभरापासून सुरु असलेल्या काकडा आरतीची ( Kakada Aarti ) सांगता झाली आहे. कार्तिकी एकादशी ( Kartiki Ekadashi ) निमित्त पायी दिंडीने आळंदी ( Alandi ) वारीसाठी निघालेल्या पवनमावळ वारकरी ( Warkari ) समाजाच्या पालखीच्या आगमनाने आणि भागवताचार्य ह.भ.प. संदिप महाराज लोहोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने ( Kirtan ) काकडा आरतीची सांगता झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोजागिरी पौर्णिमेपासून सुरु झालेल्या या काकडा आरती सोहळ्याने गावातील वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाल होते. महिनाभरापासून दररोज भल्या पहाटेपासून काकडा आरतीचे अभंग, भुपाळ्या, आंधळा-पांगळा, वासुदेव, जोगी, गौळणी गात गावातील वारकरी बंधू-भगिनी काकडा सोहळ्यात सहभागी होत होते. गायनाचार्यांच्या सुंदर आवाजात आणि वेगवेगळ्या चालींमध्ये आनंदी वातावरणात काकडा संपन्न होत असताना वारू गावासह पंचक्रोशी हरीनामाच्या गजराने आणि भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. ( Kakada Aarti Ceremony End With Kirtan In Varu village Pavan Maval )
पवनमावळ वारकरी समाजाच्या पालखीचे गावात आगमन होताच ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भोलेश महाराज ठाकुर यांची प्रवचनरूपी सेवा झाली. त्यानंतर महाप्रसाद घेऊन दिंडीचे आळंदीचे दिशेने प्रस्थान झाले. या सोहळ्यात सव्वा महिना कचरुबुवा निंबळे, बाळासाहेब निंबळे, सोपान निंबळे, दिनकरबुवा निंबळे, अदिनाथ तुपे, रमेशबुवा निम्हण, दत्ता कडू, माऊली तुपे, शेखर निंबळे यांनी नित्यनेम सहभाग घेतला. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वनाथ निंबळे, विलास निंबळे, संदिप कडू, शाहिदास निंबळे, विठठ्ल निंबळे यांनी प्रयत्न केले. यावेळी तानाजी काळे पाटील आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कालभैरव जयंती कार्तिक उत्सवानिमित्ताने वडगावमध्ये ज्ञानामृत सोहळा I Vadgaon Maval
–देव तारी त्याला कोण मारी! एका ड्रायव्हरच्या समयसुचकतेमुळे वाचला दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटना