महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा विविध समाजाची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील चैत्री यात्रेचा कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा सोमवारी (दि. 15) सायंकाळी सात वाजता कार्ला-वेहरगाव गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘आई माउलीचा उदो उदो’ ‘ आई आयलो’ च्या नामघोषांनी तसेच गीतांच्या तालावर नृत्य करत अवघा कार्ला गड दुमदुमून गेला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )

कडक पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव आणि ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत ‘आई राजा उदो उदो’चा गजर केला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती. मुंबई आणि कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस कित्येक तास पायी प्रवास करत भाविक कार्ला येथे यात्रेला दाखल झाले होते. ( Karla Ekvira Devi Yatra Ceremony Palkhi ceremony of Ekvira Devi completed )
पालखी मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, तालुका प्रशासन आणि नवनियुक्त विश्वस्त मंडळ यांनी नियोजन केले होते. यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कुंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, याकरिता तालुका प्रशासन व पोलिस विभाग यांच्याकडून सातत्याने विविध विभागाच्या बैठका घेत नियोजन करण्यात आले होते.
यात्रा काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य व सुलभ प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मावळ तहसिलदार विक्रम देशमुख, लोणावळाचे पोलिस उपविभागीय अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक,लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ,वेहेरगावच्या सरपंच व विश्वस्त वर्षा मावकर ,विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख,सागर देवकर,विकास पडवळ संजय गोविलकर, महेंद देशमुख, मंडळ अधिकारी आशा धायगुडे,मानिक साबळे तलाठी दिपक धनवडे वन विभाग अधिकारी प्रमोद रासकर,पोलिस पाटील अनिल पडवळ,संजय जाधव,जयेंद्र खुणे,चंद्रकांत देवकर तसेच विविध शासकीय अधिकाच्यांना बरोबर घेऊन यावेचे नियोजन केले गेले होते.
कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात –
यात्राकाळात कार्ला परिसरातील गावात तीन दिवस पूर्णपणे दारुबंदी तसेच यात्राकाळात ध्वनिप्रदूषणावर अंकुश ठेवण्यासाठी गडावर फटाके वाजविण्यास बंदी केली होती. पुणे ग्रामीणये पोलिस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह चार पोलिस निरीक्षक 30 सहायक पोलिस निरीक्षक, 350 पोलिस कर्मचारी, होमगार्ड, पोलिस दल तुकड्या स्ट्रायकिंग पथक विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी अशाप्रकारचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अधिक वाचा –
– ‘मावळ लोकसभेच्या विकासासाठी ‘मशाल’ चिन्ह लक्षात ठेवा’, संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– शाब्बास…! एकविरा विद्या मंदिर शाळेचे 5 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा गुणवत्ता यादीत चमकले । Karla News
– ‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक’, नात्यागोत्याच्या राजकारणावर श्रीरंग बारणेंचे रोखठोक उत्तर


