लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम येत्या जुलै 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता सचिन मुंगसे पाटील यांनी दिली. रेल्वे कडून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य कैलास वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणावळा नगर परिषदेमध्ये रेल्वे विभागांशी संबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांची चर्चा झाली. ( Lonavala Bhangarwadi Railway Flyover to be completed by July 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भाजपाकडून पुकारण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिम आंदोलनामुळे कैलास वर्मा यांनी लोणावळा रेल्वे स्थानकाला भेट दिली, तसेच भांगरवाडी रेल्वे गेट व उड्डाणपूल कामाची पाहणी केली. यावेळी बोलताना कैलास वर्मा म्हणाले की, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व रेल्वे फाटके बंद करत मार्च 2023 पर्यंत रेल्वे गेटच्या जागेवर उड्डाणपूल व भुयारी पूल बांधण्याचा मानस आहे. गती शक्ती उपक्रमामुळे ही कामे करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर लोणावळ्यातील उड्डाणपुलाचे काम सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील.
लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या कोविड पासून बंद करण्यात आले आहेत, त्या गाड्यांचा थांबा पुन्हा पूर्ववत कराव्यात, लोणावळा ते पुणे लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावे ,रेल्वे कॉलनी भागातील रस्ते व स्वच्छता ही कामे योग्य प्रकारे करून घ्यावी अशा विविध मागण्या यावेळी सर्वांनी एक मुखाने केल्या.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, नियंत्रण सुटल्याने मालवाहू टेम्पो दरीत कोसळला
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढणार