Dainik Maval News : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले होते. अखेर दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख समोर आली असून उद्या म्हणजे मंगळवारी (दि. १३ मे) रोजी दुपारी एक वाजता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहाच्वीया परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. मुळात यंदा बारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा देखील लवकर घेण्यात आली होती, त्यामुळे बारावीचा निकाल ऐतिहासिकरिच्या लवकर जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकालही लवकर जाहीर होणार, हे गृहित होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते.
त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवारी (दिनांक १३ मे) रोडी जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. यामुे बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटला असताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल :
१. http://www.mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://ssc.mahresults.org.in
असा चेक करा तुमचा निकाल :
१ : अधिकृत वेबसाइटवर जा – mahahsscboard.in, mahresult.nic.in लॉगीन करा.
२ : मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC निकाल 2025 तपासण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा
३ : दिलेल्या जागेत आवश्यक तपशील भरा
४ : महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2025 स्क्रीनवर दिसेल
५ : त्यावर नमूद केलेल्या सर्व तपशीलांवर जा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा
अधिक वाचा –
– ‘नूतन अभियांत्रिकी’ची माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे बनली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी । Talegaon Dabhade
– लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
– मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade