मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा दरम्यान इंजिनियरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांकरिता रविवार (दि. 11) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान 14 लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच या वेळी गाडी क्र. 12164 एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 3.30 तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
रद्द झालेल्या गाड्या खालीलप्रमाणे;
पुणे ते लोणावळा मार्गावर जाणाऱ्या गाड्या रद्द :
-पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.
-पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.
-शिवाजीनगरहून लोणावळा साठी 12.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01592 रद्द राहील.
– पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.
– शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.
– पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.
– शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.
लोणावळा ते पुणे मार्गावर जाणाऱ्या गाड्या रद्द :
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 11.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01591 रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.
– तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.
-लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.
( Mega Block on Pune Lonavala Railway Route 14 Rounds of Local Trains Cancelled )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News
– ठाकरे गटाने फुंकले लोकसभा निवडणूकीचे रणशिंग! ‘मावळची जागा जिंकायचीच’, पदाधिकाऱ्यांचा वडगावमधील आढावा बैठकीत निर्धार । Vadgaon Maval
– ‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस