महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण ऐतिहासिक नगरी शिवनेरी किल्ला पायथ्याशी जुन्नर येथे संपन्न झाला. मावळ तालुक्यातील पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेतील मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे, व्हि.पी.एस लोणावळा येथील शिक्षक श्रीनिवास गजेंद्रगडकर, न्यु इंग्लिश स्कूल टाकवे येथील शिक्षक नारायण असवले, संत तुकाराम विद्यालय, शिवणे येथील शिक्षक रविंद्र शेळके यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, ‘संपुर्ण महाराष्ट्रात फिरुन मी शिक्षकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार असल्याचे सांगितले. मी कोकण विभागाचा आमदार नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचा प्रतिनिधी असल्याचेच व्याधी सांगितले.’ ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे अध्यक्ष निलेश काशिद, पुणे विभागाचे संघटनमंत्री गुलाबराव गवळे, संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम असवले, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्यवाह देवराम पारीठे, कार्याध्यक्ष भारत काळे, उपाध्यक्ष सोपान असवले, सहकार्यवाह रियाज तांबोळी, सल्लागार विलास भेगडे, धनंजय नांगरे,राम कदमबांडे, संभाजी बोऱ्हाडे, समीर गाडे, गणेश ठोंबरे,विजय वरघडे विनोद भोसले,यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य पुरस्कार्थींचे कुटुंबीय मित्र व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला यांसह मावळ तालुक्यातील ‘या’ पाणीपुरवठा योजनांसाठी अधिकारी स्तरावर बैठक
– बिगुल वाजलं! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका जाहीर, 9 ऑक्टोबरपासून प्रक्रिया होणार सुरु
– स्तुत्य उपक्रम! वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप । Vadgaon Maval