व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे पक्षातील वजन वाढले, अजितदादांकडून शेळकेंना थेट राज्यस्तरीय जबाबदारी, लगेच वाचा । MLA Sunil Shelke

मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले सुनिल शेळके यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 2, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Facebook / MLA Sunil Shelke


मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खंदे समर्थक असलेले सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आमदार सुनिल शेळके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) पार्टीच्या प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. तसे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मागील अनेक दिवसांपासून आमदार सुनिल शेळके यांच्यावर पक्षाकडून अनेक जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत आणि आमदार शेळके पक्षासाठी सातत्याने देत असलेले योगदान पाहता त्यांच्यावर ही संघटनेतील राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार सुनिल शेळके यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रभारी पदाची जबाबदारी देत असताना त्यांच्याकडून पक्षाची युवक संघटना मजबूत व बळकट करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. ( MLA Sunil Shelke appointed as regional in charge of Nationalist Youth Congress Party )

राज्यातील युवक विभागातील सर्व प्रमुखांशी चर्चा व विचारविनिमय करून उपक्रमांचे व कार्यक्रमांचे नियोजन करणे, आगामी काळातील निवडणूका नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राज्यातील सर्व स्तरावरील युवक मोठ्या संखेने आकर्षित होईल यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना व कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

दमदार आणि लोकप्रिय आमदार –
राज्याच्या तत्कालीन मंत्र्याचा पराभव करून आमदार बनलेले सुनिल शेळके हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदारांपैकी एक आहेत. तरुणाईत त्यांची वेगळीच क्रेझ आहे. सोबतच अजित दादा यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. 2019 चे बंड असो किंवा गतवर्षीचे पक्षातील सर्वात मोठे बंड असो, सुनिल शेळके हे नेहमीच अजित पवार यांच्या सोबत राहिलेत. म्हणूनच आमदार म्हणून आजवर भरघोस निधी शेळकेंच्या वाट्याला आला. तर, आता त्यांचे पक्षातील राजकीय वजन देखील वाढताना दिसत आहे.

अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway
– आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award
– ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval

Next Post

महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shasan-Aplya-Dari

महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून 'शासन आपल्या दारी' अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.