पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. अत्यंत नाट्यमय घडामोडी आणि सस्पेन्स कायम ठेवत अखेर भाजपानेही दोन्ही ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तर, दुसरीकडे महाविकासआघाडीने दोन्ही ठिकाणच्या निवडणूका लढवायच्याच या इराद्याने कसब्याची जागा काँग्रेसच्या खात्यात टाकली असून चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी अनेक बंडखोर देखील आहेत, मात्र निवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी अजून अवकाश असल्याने तो दिवस उलटल्याशिवाय अंतिम चित्र स्पष्ट होणार नाही. ( NCP Announced Names Of 20 Star Campaigners For Kasba And Chinchwad Assembly Constituencies By-Elections Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाविकासआघाडीने मात्र दोन्ही जागी तगडे उमेदवार देऊन दंड थोपटले आहेत. पुण्यातील ( Pune News ) कसब्यात भाजपाच्या हेमंत नारायण रासने यांच्याविरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे हे रिंगणात आहेत. सध्या तर शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी इथे बंडोखोरी करुन सर्वांच्याच चिंतेत भर टाकली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीनंतरच कुणामध्ये लढत असेल, हे स्पष्ट होईल. असे असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला म्हणजे नाना काटे यांना जिंकवण्यासाठी कंबर कसली असून यासाठीचे पहिले पाऊल म्हणून दोन्ही विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! प्रसिद्ध निरुपणकार डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीत एकूण 20 नावे असून अनेक दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वतः शरद पवार यांच्यासह चिंचवड विधानसभेवर चांगला प्रभाव असणारे मावळचे ( Maval News ) आमदार सुनिल शेळके यांचाही समावेश आहे. ( NCP Announced Names Of 20 Star Campaigners For Kasba And Chinchwad Assembly Constituencies By-Elections Pune )
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची नावे
1. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष – शरद पवार
2. विरोधी पक्ष नेते – अजित पवार
3. प्रदेशाध्यक्ष – जयंत पाटील
4. माजी गृहमंत्री – दिलीप वळसे पाटील
5. खासदार – सुनील तटकरे
6. माजी मंत्री – फौजिया खान
7. खासदार – सुप्रिया सुळे
8. माजी आरोग्यमंत्री – राजेश टोपे
9. खासदार – वंदना चव्हाण
10. आमदार – शशिकांत शिंदे
11. राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख – विद्या चव्हाण
12. आमदार – अमोल मिटकरी
13. माजी उपमुख्यमंत्री – छगन भुजबळ
14. आमदार – एकनाथ खडसे
15. आमदार – जितेंद्र आव्हाड
16. आमदार – धनंजय मुंडे
17. खासदार – अमोल कोल्हे
18. आमदार – सुनिल शेळके
19. आमदार – निलेश लंके
20. पक्षाचे पदाधिकारी – शेख सुभान अली
अधिक वाचा –
– सुनिलआण्णा शेळकेंची शिष्ठाई अयशस्वी, राहुल कलाटे यांनी बंडखोरी केलीच, उमेदवारी अर्जही भरला
– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट! शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज, लगेच वाचा