पवन मावळ भागातील ठाकूरसाई ते जवण क्रमांक – 3 या मुख्य रस्त्याची सुधारणा करुन डांबरीकरण करणे ह्या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दिनांक 14 नोव्हेंबर) आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पवना धरणाच्या बाजूने जाणारा हा रस्ता भविष्यात येथील गावकऱ्यांसाठी, इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच येथील परिसराच्या विकासासाठी ‘राजमार्ग’ ठरू शकतो. या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शेळकेंसह, अनेक जेष्ठ मान्यवर, परिसरातील गावांतील आजी-माजी सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रथमच होणाऱ्या या मुख्य रस्त्यासाठी सुमारे 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ‘पक्के रस्ते हे ग्रामीण भागातील विकासाचा पाया आहे. पवना धरण परिसरात पर्यटनासाठी लाखो पर्यटक येत असतात. ठाकूरसाई आणि इतर गावांमध्ये पर्यटनावर आधारित अनेक छोटे-मोठे व्यवसाय स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. परंतू रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे पर्यटकांनाही याचा त्रास होत होता. तसेच शेतकरी, दूध व्यवसायिक, विद्यार्थी यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर या रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने समाधान वाटत आहे.’ अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( New Road from Thakursai to Javan village Bhoomipujan by MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – खासदार श्रीरंग बारणे
– दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी ‘या’ नगरसेवकाचे नाव चर्चेत
– सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न; पिंपलोळी गावातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी