मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते इंदोरी इथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन (Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra) संपन्न झाले. यावेळी अनेक शेतकरी बांधव स्वयंस्पूर्तीने उपस्थित होते. ह्या केंद्राच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या कृषी विषयक शेतकरी हिताच्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या विविध योजनातील अनुदानावर उपलब्ध होणारी खते, बी, बियाणे, औषध आणि कीटकनाशके या केंद्रावर अल्पदरात उपलब्ध होणार आहेत.
तसेच माती परीक्षण, शेतकऱ्यांना पीक पद्धती बद्दल मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षणासह शेती संबंधी नव नवीन तंत्रज्ञानाची माहिती या केंद्रावर शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी या केंद्रांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. कृषी विभागाच्या योजना राबवत असताना शेतकऱ्यांना त्याची माहिती सहजरीत्या स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी यासाठी या प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा मोठा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. ( Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra open at Indori Village Maval Taluka )
या उद्घाटनावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, गाव अध्यक्ष जगन्नाथ शेवकर, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शेवकर, इंद्रायणी कृषी सेवा केंद्राचे प्रमुख भागूजी दाभाडे, माजी सरपंच संदीप काशीद, प्रगतशील शेतकरी जनार्धन भेगडे, संजय भेगडे, काशिनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विनोद भागवत, मुकेश शिंदे, अरविंद शेवकर, गणेश दाभाडे, कृषी सहाय्यक स्वाती घनवट यांच्यासह इंदोरी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची स्थापना…
पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र ही शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करतील आणि शेतकऱ्यांना कृषीविषयक साहित्य (खते, बियाणे, अवजारे), मृदा, बियाणे आणि खते यांच्या तपासणीची सुविधा पुरवतील. तसेच ही केंद्रे सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. शेतकऱ्यांची शेतीसाहित्य, कृषी निविष्ठा, नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयक माहितीचे आदान-प्रदान, त्यांच्या मालाची सुरक्षितता, पाश्चात्य देशात विकसित होत असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी जागरुकता, मार्गदर्शन, दळवणवळणाच्या पुरेशा सोईसुविधा यासंदर्भात गैरसोय होऊ नये, त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे एकाच ठिकाणी उत्तर मिळावे, त्यांना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्री देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल वारकरी वेशभूषा संमेलन ऑनलाईन स्पर्धेची पारितोषिके प्रदान
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत