मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी राजू नारायण फलके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत तालुका उपाध्यक्षपदी फलके यांची नियुक्ती करण्यात आली. तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, महिलाध्यक्ष प्रतिमा हिरे, रोहीदास वाळुंज, मिलिंद अच्युत, राजेश वाघोले, खंडुजी तिकोने, राजू शिंदे, विशाल वाळुंज, योगेश पारधे आदी यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वसुबारस : दिवाळीचा पहिला सण असलेल्या वसुबारसचे महत्व काय? वसुबारस कशी साजरी करतात? जाणून घ्या
– आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसचा ‘एल्गार’! आमदार रवींद्र धंगेकरांचा मावळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘कानमंत्र’
– आमदार सुनिल शेळकेंना कलाकार चाहत्याकडून भन्नाट गिफ्ट; भेट पाहून ‘आण्णा’ही भावूक