सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे जानेवारी 2023 चे धान्य मिळालेले नाही, अशा लाभार्थ्यांना जानेवारीचे धान्य फेब्रुवारी 2023 च्या धान्यासह स्वस्तधान्य दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. पिवळे कार्डधारकांना प्रति कार्ड 35 किलो, केशरी कार्डधारकांना प्रति लाभार्थी 5 किलो मोफत धान्य वाटपासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे. ( Ration Card Holders Will Get January Grain Along With February Also Appeal To Add Mobile Number Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक फेब्रुवारी व मार्च 2023 चे धान्य घेताना समाविष्ट करुन घ्यावेत. लाभार्थ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यास त्यांनी धान्य घेतल्यानंतर प्राप्त होणारे संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आपले धान्य घेतावेळी दुकानदारांकडे ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करता येतील.
तसेच यापूर्वी समाविष्ट भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा असल्यास सुधारित भ्रमणध्वनी क्रमांक तालुका पुरवठा कार्यालयात देऊन प्रणालीमध्ये समाविष्ट करता येणार येणार आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालय, परिमंडळ कार्यालय तसेच रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
– ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल
– रस्त्यावर खडी टाकल्यामुळे वाद, 70 वर्षीय वृद्धावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न, बेबडओहळ येथील धक्कादायक प्रकार!