पवन मावळ भागातील हजारो शेतकरी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांची तहान भागवणारे पवना धरण आजमितीला 94 टक्के इतके भरले आहे. पवना धरण परिसरात मागील दोन आठवड्यापासून वरुणराजा नित्यनेमाने बरसत आहे. त्यामुळेच धरणात पाण्याची सातत्याने आवक होऊन धरणातील पाणीसाठा शंभरीच्या जवळ पोहोचला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरवासीय आणि मावळ तालुक्यातील सामान्य नागरिक, शेतकरी ह्यांच्या वर्षभराची चिंता आता मिटली आहे. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पवना धरणातील पाण्याचे जलपुजन केले आणि आनंद साजरा केला. ह्यासह पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त (27 जुलै) सुरु असलेल्या वृक्षलागवड पंधरवडा अनुषंगाने वृक्षारोपण देखील करण्यात आले. ( shiv sena uddhav balasaheb thackeray party workers offer jal pujan at pavana dam )
मावळ तालुक्याचे वैभव, शेतकरी कुटुंबाची आई, मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड महानगराची तहान भागवण्यासाठी सदैव तयार असणारी पवनामाई ह्या नदीचे उगमस्थान म्हणजेच पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यानिमत्त रविवारी (दिनांक 6 ऑगस्ट) मावळ तालुका शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने जल पूजन संपन्न झाले. तसेच पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या वृक्ष पंधरवडा कार्यक्रमाचे औचित्य साधत पवनानगर इथे वृक्षरोपण देखील करण्यात आले.
ह्याप्रसंगी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी उप जिल्हाप्रमुख भारत ठाकूर, मावळ तालुका संघटक शांताराम भोते, पवनानगर शहर प्रमुख सुरेश गुप्ता, माजी सरपंच अनिल भालेराव, शाखा प्रमुख उमेश ठाकर, प्रिया उमेश ठाकर, उपसरपंच शामबाबू वाल्मिकी, इंद्रजीत तिवारी, अविनाश शिंदे, सुनिल इंगुळकर, तुषार घाग, राहुल जव्हेरी, संतोष कालेकर, प्रवीण कालेकर, नरेश घोलप, सोमनाथ कचरे, अक्षय कालेकर, दत्ता दाभाडे, पवन मावळ प्रसिध्दी प्रमुख किशोर शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी
– राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना
– काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?