तळेगाव दाभाडे शहरातील राव काॅलनी येथे तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. तसेच शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान देखील करण्यात आला. श्री डोळसनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष समीर शंकरराव भेगडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, राणी साहेब, बाजीप्रभू देशपांडे, तसेच मावळे अशा विविध वेशभूषा करून बालचमू सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी पोवाडा सादर केला. विविध मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावीतील 16 विद्यार्थ्यांना “सन्मानचिन्ह” देऊन गौरविण्यात आले.
विशाल थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले, समीर भेगडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख वक्ते प्रशांतजी दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. श्रीकांत मेढी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, मयुर शिंदे यांनी आभार मानले. ( Shiva Rajabhishek Day celebrated in Talegaon Dabhade city )
यावेळी महिंदा कंपनीचे अधिकारी प्रसाद पादीर, रोहित थोपटे, अमित पाटील, अनिकेत शेटे, हर्षल गरूड, योगेश उभे, पद्मनाभ पुराणिक, अंकुश गायकवाड, संतोष पंडीत, अशोक पाटील, अरुण बैरागी, भागवत मोरे, दिलीप शृंगारपुरे, दत्ता जायगुडे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि राव काॅलनीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लोणावळा शहर बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर कायमचा उपाय ! एकेरी वाहतुकीचा पर्याय फायनल । Lonavala News
– एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway
– मावळातील दिंड्यांकडून आमदार सुनिल शेळकेंचा सन्मान ; आमदार शेळके संतांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे गौरोद्गार