व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 26, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाब्बास पैलवान..! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी मावळचा पैलवान वैष्णव आडकर याने पटकावले रौप्यपदक । Wrestler Vaishnav Adkar

वैष्णव आडकर यांचे मागील पाच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे तिसरे रौप्यपदक आहे. silver medal to wrestler baishnav adkar from maval pune at khelo india national wrestling competition.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 31, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
wrestler-baishnav-adkar

Photo Courtesy : Team Dainik Maval


चेन्नई (तामिळनाडू) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पैलवान वैष्णव नारायण आडकर याने सलग दुसऱ्या वर्षी ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात 65 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णव आडकरचे हे मागील पाच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ पुणे जिल्हा व तालुक्यात कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पै. वैष्णव नारायण आडकर याने चेन्नई, तामिळनाडू येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात 65 किलो वजनी गटात रुपेरी कामगिरी केली आहे. त्याने 65 किलो गटातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत अत्यंत अतितटीच्या लढतीत पंजाबच्या मल्लाकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्याने दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ( silver medal to wrestler baishnav adkar from maval pune at khelo india national wrestling competition )

  • वैष्णव याची हि पाचवी राष्ट्रीय स्पर्धा होती. पाच राष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्यपदके पटकाविली आहे. गतवर्षी भोपाळ, मध्यप्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही 65 किलो वजनी गटात रौप्यपदक तर रांची, झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते. तर हरीद्वार व हारीयाणा येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर राष्ट्रीय व राज्य शालेय कुस्ती स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे.

वैष्णव हा मावळ तालुक्यातील शिवली गावातील राष्ट्रीय स्तरावर खेळलेला सहावा राष्ट्रीय कुस्तीगीर आहे. यामध्ये त्याचा भाऊ राष्ट्रीय कुस्तीगीर विपुल आडकरचाही समावेश आहे. वैष्णवचे वडील पै. नारायण आडकर व आजोबा स्वर्गीय दशरथ आडकर हे जिल्ह्यातील नामवंत कुस्तीगीर होते. वैष्णव हा वारजे, पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे व किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.

वैष्णव याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस पै. मारुती बहिरु आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, सहसचिव पै. पप्पू कालेकर, उपाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, पै. तानाजी कारके, राष्ट्रीय कुस्तीगीर पै.नागेश राक्षे  यांच्यासह मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

अधिक वाचा –
– अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील ‘या’ भागात घडली घटना
– धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याची ग्रामसेवकाला मारहाण, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना । Gram Sevak Beaten Maval News
– ‘मामांना महाराष्ट्र भूषण’, मराठी सिनेरसिक आनंदी! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण जाहीर । Ashok Saraf Maharashtra Bhushan


Previous Post

मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत युवक काँग्रेसचे वडगावमध्ये आंदोलन; शिक्षक भरती, तलाठी भरती, वीज प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदने

Next Post

छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या जिवंत स्मृती असणाऱ्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत होणार? भारत सरकारचा यूनेस्कोला प्रस्ताव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Forts-In-Maharashtra

छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या जिवंत स्मृती असणाऱ्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत होणार? भारत सरकारचा यूनेस्कोला प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

com maharashtra devendra fadanvis

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

June 26, 2025
Fake UPI payment

Lonavala : गर्दीचा फायदा घेत दुकानदारांची फसवणूक, लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश, पोलिसांचे आवाहन…

June 26, 2025
Road work from Panchayat Samiti Chowk to Mahadji Shinde Udyan in Vadgaon Maval stalled

…अन्यथा साठलेल्या पाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना होडी-होडी खेळायला लावू – मनसे

June 26, 2025
Villagers protest against Vadgaon Nagar Panchayat by performing abhishek at Mahadev temple

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा श्री महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून ग्रामस्थांकडून निषेध । Vadgaon Maval

June 26, 2025
ancient-shivling-found-on-hill-in-kamshet-maval-limits

कामशेत शहर हद्दीतील टेकडीवर सापडले पुरातन शिवलिंग ; ग्रामस्थांसह शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण । Kamshet News

June 26, 2025
Crime

नायगाव येथील टोनी दा ढाब्यावरील हाणामारीप्रकरणी सात जणांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी । Maval Crime

June 25, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.