हॅण्ड इन हॅण्ड इंडिया, तळेगाव (दाभाडे) आणि सहासंखा (CSR) यांच्या मार्फत मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील तुंग गाव येथे सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांबाबत ग्रामीण भागातील नागिरकांमध्ये पुरेशी जाणीव-जागृती नसते. त्यामुळे पात्र असूनही अनेक नागरिकांना अशा योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अशा योजनांबद्दल जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. ( Social Security Scheme Awareness Program At Tung Village Maval Taluka Through Hand In Hand India NGO Organization )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तुंग गावातील सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, ई – श्रम कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, संजय गांधी निराधार योजना (वृद्ध, विधवा, विकलांग), प्रधानमंत्री उज्वला योजना, सुकन्या समृध्दी योजना, प्रधानमंत्री पशुधन विमा योजना, स्कॉलरशिप, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, शिक्षणाचा अधिकार (RTE) व सार्वजनिक वितरण प्रणाली ( राशन स्वस्थ धान्य) इत्यादी विवीध योजनाची माहिती नागरिकांना देण्यात आली.
View this post on Instagram
सदर सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये तुंग गावातील 31 नागरिकांनी उपस्थिती नोंदवली, त्यासोबत गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सी. आर.पी. सिमा पठारे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून परमेश्वर ज. कांबळे, सारिका शिंदे, मलेका अन्सारी, निकिता मोरे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून सारिका शिंदे यांनी गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले. ( Social Security Scheme Awareness Program At Tung Village Maval Taluka Through Hand In Hand India NGO Organization )
अधिक वाचा –
– दुपारची लोकल रेल्वे सेवा पुर्ववत करा, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर आंदोलन
– लोणावळा जवळील वलवण पुलावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक, टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
– ‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास…काम थांबवू’, वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा