“आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या व्यवसाय वाढीसाठी मेहनतीने व चिकाटीने करा” असे आव्हान बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदुरी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक सुमित वाडेकर यांनी केले. तळेगाव दाभाडे येथील रुडसेट संस्थाच्या वतीने आयोजित केलेल्या सीसीटीव्ही दुरुस्ती व देखभाल तसेच दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती कार्यक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते.
हे प्रशिक्षण भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय च्या अंतर्गत श्रीक्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथेश्वर एज्युकेशन ट्रस्ट व कॅनरा बँक यांच्या प्रयोजनाने विनामूल्य रहिवास प्रशिक्षण व भोजन या स्वरूपात अनुक्रमे तेरा दिवस व दहा दिवसचे आयोजन संस्थेचे संचालक प्रवीण बनकर यांनी केले. समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण संदीप पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन दिनेश निळकंठ यांनी केले. याप्रसंगी महेश सुपेकर, धनंजय टीळे व चेतन शिंदे यांनी या दिवसात आलेल्या अनुभव कथन करून निश्चितच एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना सुमित वाडेकर म्हणाले की, “आपला व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर त्यासाठी मेहनत कष्ट आणि प्रशिक्षणाची गरज असते. आपल्याला ते मिळाले असून त्याचा वापर यशस्वी होण्यासाठी करावा व स्वतःबरोबर इतरांच्या ही प्रगतीमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा.” यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल भारत सरकारच्या स्किल डेव्हलप अंतर्गत व एन सी व्ही टी(NCVTI) मान्यताप्राप्त प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र बावचे, योगिता गरुड, रवी घोजगे व बाळू अवघडे यांनी विशेष प्रयत्न घेतले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भाजे येथील संपर्क बालग्राममधील विद्यार्थिनींना करिअर विषयक मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा उपक्रम
– देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धेत भोयरे, लोणावळा, भाजेगाव आणि तळेगाव दाभाडे येथील शाळांना यश । Maval Taluka News
– लोणावळा शहरात ‘इंडियन स्वच्छता लीग’, काय आहे उद्देश? वाचा सविस्तर