व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! ‘पीएमआरडीए’कडून रस्ते विकासकामांना गती

‘पीएमआरडीए’कडून चाकण आणि तळेगाव परिसरासाठी पूर्व बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून, त्याचाच भाग म्हणून चार रस्ते तयार केले जाणार आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
new expressway route highway road way

File Image


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण औद्योगिक क्षेत्रांतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. यात पुणे- नाशिक महामार्गावर चार पर्यायी बाह्यवळण रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यात येत असून, हे काम प्रगतिपथावर आहे.

‘पीएमआरडीए’कडून चाकण आणि तळेगाव परिसरासाठी पूर्व बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून, त्याचाच भाग म्हणून चार रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

तळेगाव-चाकण महामार्गावरील हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा तीन येथे खराबवाडीला जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता ९०० मीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंद असेल. हिंगणे ते चौक फोक्सवॅगन कंपनीला जोडणारा हा रस्ता असेल. या रस्त्यामुळे तळेगाव, चाकणमधील टप्पा दोन व तीनमधून नाशिक व पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्गाशी जोडली जाईल. त्यातून तळेगाव चौक आणि चाकणमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

नाणेकरवाडीतील सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंपाला जोडणारा १.२ किलोमीटर लांबीचा आणि १५ मीटर रुंद रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता तळेगाव आणि चाकणमधील टप्पा दोन व तीनला पुणे-नाशिक महामार्गाशी जोडेल. यामुळे मुख्य चाकण चौकातील कोंडी कमी होण्यास मदत होईल. याचबरोबर मेदनकरवाडीतील बंगला वस्ती चौक ते रासे फाटा पर्यंतचा २.५ किलोमीटर लांबीचा आणि ३५ मीटर रुंद रस्ता तयार केला जाणार आहे.

हा रस्ता पुणे, तळेगाव आणि चाकण टप्पा दोन व तीनला नाशिक महामार्गावरून शिक्रापूर राज्य मार्गावर रासे फाटा येथे जोडतो. तसेच, पश्चिम बाह्यवळण मार्गाअंतर्गत पुणे-नाशिक महामार्गाला चाकण टप्पा पाचला जोडणारा ८५० मीटर लांबीचा रस्ता आणि ४५ मीटर रुंद विकसित केला जाणार आहे. यामुळे चाकण चौक, आंबेठाण चौकातील अवजड वाहतूक जलद होणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत


dainik maval jahirat

Previous Post

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

Next Post

महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
old stone bridge over Indrayani River at Pathargaon maval has been closed to traffic

महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.