मुंबई आणि लोकल रेल्वे सेवा हे जणू एक कुटुंबच आहे. मुंबईच्या जनतेसाठी रेल्वे हे त्यांचे जसे काय सेकंड होम असते. मात्र अलिकडे लोकलमधील आणि परिसरातील काही घटना पाहता मुंबईकर खरंच लोकलला खरोखरचे ‘घर’ समजू लागले आहेत की काय, अशीही शंका येऊ लागली आहे. कारण काही घटना प्रकार हे इतर सहप्रवासी आणि नागरिकांना त्रासदायक ठरत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मुंबईच्या एका प्लॅटफॉर्मवर प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
abhaysingh5_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे दिनांक 21 मार्चचा हा व्हिडिओ आहे. यात व्हिडिओत दिलेल्या कॅप्शन टेक्स्टनुसार हा व्हिडिओ मुंबईतील डोंबवली रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर असलेला सांगितला जात आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की वर्दळ असताना आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी नागरिकांची गर्दी असतानाही एक जोडपे एकमेकांना किस करत आहेत. त्यांची ही ‘क्रीडा’ अनेक मिनिटे सुरु होता. एका प्रवाशाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करुन तो सोशलवर अपलोड केला आहे. ( Video Of Couple Kissing At Mumbai Dombvali Railway Station Has Gone Viral On Social Media )
हेही वाचा – मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणाईने भीमगीतावर धरला ठेका – व्हिडिओ तुफान व्हायरल
View this post on Instagram
यांना आवरा रे…
अशा घटना हल्ली वाढतच चालल्यात… कठीण आहे सर्व…
मुंबईकर खरंच लोकल आणि परिसराला घर समजू लागलेत की काय?
महोदय, पायबंद घालता येईल ना ?? @CPMumbaiPolice @MumbaiPoliceVideo Courtesy : IG / abhaysingh5_ #Mumbai #ViralVideo #मुंबई #व्हायरल_व्हिडिओ pic.twitter.com/HSysSJ5W5y
— Dainik Maval दैनिक मावळ (@DainikMaval) March 31, 2023
मुळात प्रेम आणि शारिरिक जवळीक या सर्व खासगी गोष्टी आहे, त्यांचे असे समाजात खुलेआम प्रदर्शन करणे आणि इतर सामान्य नागरिकांना त्रास होईल किंवा त्यांची कुचंबना होईल अशा रितीने समाजात वागणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच अशा गोष्टींना पायबंद घालणे आवश्यक आहे.
अधिक वाचा –
– तळेगावात कोयता गँगची दहशत; ‘मोबाईलचे हप्ते भरणार नाही, काय करायचे ते कर’ म्हणत एकावर जीवघेणा हल्ला, 3 आरोपी अटकेत
– प्रभू श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमली वडगाव नगरी; मावळ तालुक्यात श्रीराम जन्मोत्सव थाटामाटात साजरा