व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रस्त्याच्या बाजूला त्याला पाण्यात काहीतरी दिसले, निरखून पाहिले तेव्हा शॉकच बसला! 15 फुटी अजगर मस्तपैकी…

मावळ तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळून येतात. त्यातही अजगर प्रजातीचे साप आढळून येण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 29, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ
Python-Snake-Rescue

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळून येतात. त्यातही अजगर प्रजातीचे साप आढळून येण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. औंढोली या गावात तर अलीकडे अनेकदा अजगर जातीचे साप आढळून आलेत. परंतू शुक्रवारी मावळमधील बोरज गावात 4 – 5 नव्हे तब्बल 15 फुटी अजगर आढळून आला. खाऊन सुस्तावलेला हा अजगर पाहण्यांसाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. वन्यजीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र आणि वनविभाग यांनी या अजगराला तिथून रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडून दिले. ( 15 Foot Python Snake Rescue In Boraj Village of Maval Taluka )

मावळ तालुक्यातील बोरज गावात एका कुटुंबाच्या गाईच्या गोठ्यापासून बऱ्याच अंतरावर डोंगरामध्ये रस्त्याच्या बाजूला असेलल्या पाण्याच्या ओहोळात एक भलामोठा अजगर साप होता. ह्या अजगराने काहीतरी खाल्ल्याने तो प्रचंड सुस्तावला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने इतरांना सांगितले. हळूहळू तिथे ह्या अजगराला पाहायला गर्दी होऊ लागली. तेव्हा स्थानिकांपैकी एकाने शिवदुर्ग टीमला याबाबत कळवले. त्यानंतर शिवदुर्ग मित्रचे सुनिल गायकवाड आणि वन्यजीव रक्षक मावळचे निलेश गराडे ह्यांनी तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले.

त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या सदस्यांनी तिथे धाव घेतली. तेव्हा त्यांनी पाहिले की अजगर सुस्थितीत होता, पण वाढती गर्दी आणि परिसरातील आदिवासींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजगराला तिथेच सोडून देणे ठिक नव्हते. त्यामुळे रेस्क्यू टीमने अजगराची तिथून सोडवणूक करत त्याला दूर जंगलात सोडून दिले.

नागरिकांनी पावसाळ्यात अधिक काळजी घ्यावी. साप अथवा अजगर वगैरे परिसरात आढळून आल्यास वनविभाग किंवा वन्यजीव रक्षक, शिवदुर्ग मित्र ह्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केले. शिवदूर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची टीम, वन्यजीव रक्षकचे अध्यक्ष अनिल आंद्रे, जिगर सोलंकी, दक्ष काटकर, यश वाडेकर, तेजस केदारी, बबल्या मुऱ्हे, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे आणि स्थानिक मित्र आदींचा अजगर रेस्क्यूत सहभाग होता. ( 15 Foot Python Snake Rescue In Boraj Village of Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें! परंदवडी इथे तब्बल 8000 वृक्षांची लागवड
–  मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध; वडगाव मावळ शहरात ट्रायबल फोरमकडून भव्य मोर्चा
– निला केसकर ह्यांचा कार्यपूर्ती गौरव सोहळा; सेवानिवृतीनंतर नवीन ध्येय प्राप्त करण्याचा शुभारंभ होतो – संतोष खांडगे


Previous Post

बेकायदा पार्किंग ते चौकाचौकात सीसीटीव्हीची गरज; मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट । Vadgaon Maval

Next Post

साते – मोहितेवाडी काँग्रेस (आय) कमिटीच्या अध्यक्षपदी अंतोष मालपोटे । Maval Politics News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
congress-maval-pune

साते - मोहितेवाडी काँग्रेस (आय) कमिटीच्या अध्यक्षपदी अंतोष मालपोटे । Maval Politics News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
Transport Minister Pratap Sarnaik inspects Lonavala bus stand Maval

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी

April 30, 2026
Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.