व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतवर आता ‘प्रशासक’राज, नगराध्यक्ष-नगरसेवक बनले ‘माजी’ तर सीईओ बनले ‘कारभारी’ । Vadgaon Maval

दिनांक 15 जुलै 2018 मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक निर्वाचित झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 9, 2023
in लोकल, मावळकट्टा, शहर
vadgaon-nagar-panchayat

File Image


मावळ तालुक्याचे केंद्र असलेल्या वडगाव शहर नगरपंचायतीमधील लोकनियुक्त नगराध्य़क्ष आणि नगरसेवक यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून नव्या नगरपंचायतच्या स्थापनेसाठी निवडणूक होईपर्यंत सर्व कारभार हा प्रशासकाच्या हाती राहणार आहे. त्यामुळेच वडगाव नगरपंचायतवर आता ‘प्रशासक’राज आले आहे. ( Vadgaon Nagar Panchayat Tenure Ended Praveen Nikam Will Take Charge As Administrator )

वडगाव शहराचा कारभार पूर्वी ग्रामपंचायतकडे होता. परंतू फेब्रुवारी 2018 मध्ये तत्कालीन आमदार बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांतून ग्रामपंच्यातीचे युती सरकारने नगर पंचायतीत रुपांतर केले. दिनांक 15 जुलै 2018 मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक निर्वाचित झाले. मयूर ढोरे यांना शहराचे प्रथम लोकानियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

वडगाव नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक 8 ऑगस्ट 2018 रोजी झाली आणि तेव्हापासून नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ सुरू झाला होता. तो मंगळवारी संपुष्ठात आला. पाच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आणि मनसेच्या एका सदस्याला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. तर भाजपच्या अर्चना म्हाळसकर यांना प्रथम तर मनसेच्या सायली म्हाळसकर यांना शेवटच्या टर्ममध्ये उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. पाच वर्षात भाजपच्या सात तर राष्ट्रवादी काँगेसच्या तीन कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळाली.

मंगळवारी (दिनांक 8 ऑगस्ट) रोजी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये आता प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम हे सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे आता निवडणूक होईपर्यंत नगरपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती राहणार आहे. ( Vadgaon Nagar Panchayat Tenure Ended Praveen Nikam Will Take Charge As Administrator )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावरील ‘त्या’ ठिकाणी जाऊन शिवसेना (उ.बा.ठा.) आणि काँग्रेस नेत्यांकडून शहीद शेतकऱ्यांना वंदन । Photo
– उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासनाचा टाटा पॉवर सोबत करार; मावळ तालुक्यात ‘इथे’ होणार प्रकल्प
– Breaking! ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन । Hari Narke Passed Away


dainik maval jahirat

Previous Post

मावळ गोळीबार घटनेची 12 वर्षे! पवनानगर इथे शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण, भाजपकडून जलवाहिनीबद्दल भुमिका स्पष्ट

Next Post

भात उत्पादन वाढीसाठी पवनमावळात चारसूत्री पद्धतीवर प्रकल्पाचे आयोजन; कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना निविष्टा वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
rice-production-maval

भात उत्पादन वाढीसाठी पवनमावळात चारसूत्री पद्धतीवर प्रकल्पाचे आयोजन; कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना निविष्टा वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.