व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

म्हाडातर्फे पुणे विभागात 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार

म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली शहरातील 5 हजार 863 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 7, 2023
in पुणे, महाराष्ट्र, शहर
MHADA

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार ८६३ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून दिनांक 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. ( MHADA Announced Allotment of 5863 Flats In Pune Pimpri-Chinchwad Kolhapur Solapur and Sangli Cities _

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते मंगळवारी (दिनांक 5 सप्टेंबर) म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जयस्वाल यांनी सांगितले की नूतन एकात्मिक गृहनिर्माण लॉटरी व्यवस्थापन संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्री करिता सोडतीची प्रक्रिया राबवली जात असून सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्काळ ऑनलाईन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील म्हणाले, म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली शहरातील 5 हजार 863 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 सप्टेंबर असून घरांची सोडत 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत आहे त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाची छाननी देखील ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना 27 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती 28 सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. 29 सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.

सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे, हरकती 12 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

सोडतीत पुणे जिल्ह्यासाठी 5 हजार 425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यासाठी 69 सदनिका, सांगली जिल्ह्यासाठी 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2 हजार 445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीला मिळाले नवे ‘कारभारी’, 5 वर्षांत 4 कारभारी
– खेळाला साहित्याची जोडी, लहानग्यांना लागणार वाचनाची गोडी! शिळींब गावात ‘पालवी’ वाचनालयाची सुरुवात
– झाडांची भेट आणि वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरे; टाकवेतील 3 युवकांच्या पर्यावरणपुरक सेलिब्रेशनचं सर्वत्र कौतूक


dainik maval jahirat

Previous Post

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून कांदा अनुदान वितरणाला सुरुवात, थेट खात्यात येणार पैसे

Next Post

सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज ते सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mantralay-Maharashtra

सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज ते सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.