व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साहेब…एखादा पुर्णवेळ माणूस द्या!! ‘6 महिने झाले ग्रामविकास अधिकारी नाही..’, खडकाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची जिल्ह्यात चर्चा

गावचा कारभार पाहणाऱ्या सरपंचाच्या मदतीला असणारा सरकारी अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 25, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Khadkale-Khamshet-Kamshet-Gram-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


गावचा कारभार पाहणाऱ्या सरपंचाच्या मदतीला असणारा सरकारी अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी. ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत आणि सरकार यांच्याचील दुवा. ग्रामसेवकाच्या माध्यमातूनच नागरिकांना जन्म दाखल्यापासून ते मृत्यू दाखल्यापर्यंत सर्व महत्वाची कागदपत्रे मिळत असतात. परंतू एखाद्या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकच नसेल किंवा कधी तरी ग्रामसेवक हजेरी लावत असेल, तर त्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा होत असेल, याची कल्पना गावखेड्यात राहणारे नागरिकच चांगल्या प्रकारे करु शकतात. ( Khadkale Khamshet Kamshet Gram Panchayat Villagers On Hunger Strike To Get Full Time Village Development Officer )

मावळ तालुक्यातील खडकाळे खामशेत ग्रुप ग्रामपंचायतचे ( कामशेत ) ग्रामस्थ सरपंच यांनी ग्रामपंचायतीला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा यासाठी थेट उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मागील सहा महिन्यांपासून गावाला पुर्णवेळ ग्रामसेवक नाही, त्यामुळे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील बहुतांष ग्रामस्थ ह्यांनी थेट पंचायत समिती मावळ कार्यालयाच्या चौकात मंडप टाकून लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. ग्रामपंचायत खडकाळा – खामशेत ही मावळ तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे. एक निमशहरी भाग बनलेल्या या गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असणे आवश्यक आहे, मात्र गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थ आणि सरपंच – उपसरपंच यांची आहे.

गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला, तरीही पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी उपलब्ध झाला नाही. गावातील अनेक कामे, कागदपत्रे मिळवणे यासाठी नागरिकांना खेटे मारावे लागतात. विद्यार्थी, सामान्य नागरिक यांची यात ससेहोलपट होते, असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. नाईलाजास्तव आम्हाला उपोषणाचे हत्यार उगारावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील अनेक गावांची हीच ओरड आहे. ग्रामसेवक हा प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अत्यंत महत्वाचा माणूस, परंतू तालुक्यातील अनेक ठिकाणी चार-चार पाच-पाच गावांना मिळून एक ग्रामसेवक आहेत. अशात ह्या ग्रामसेवक मंडळींकडून कुठल्याही एका गावावर योग्य प्रकारे लक्ष केंद्रीत होताना किंवा सहकार्य होताना दिसत नाही. आज मी ह्या गावात आहे तुम्हाला उद्या भेटतो, उद्या मी पंचायत समितीला आहे, तुम्हाला परवा भेटतो, अशी कारणे सांगणे ह्यामुळे ग्रामसेवक मंडळींना सोपे जाते. त्यामुळे खडकाळा खामशेत ग्रामपंचायतीच्या उपोषणातून मार्ग काढत असताना संपूर्ण तालुक्यातील परिस्थिती विचारात घेऊन प्रशासन निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील लोकन्यायालयात तब्बल 8 कोटी 27 लाखांची वसुली; 4 हजार 611 प्रकरणे निकाली
– मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार
– आढे गावाजवळ पवना नदीत वाहून गेला नागरिक; 48 तासानंतर मिळाला मृतदेह


dainik maval jahirat

Previous Post

माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पल्लवी मराठे बिनविरोध । Maval Politics

Next Post

चोरांचा सुळसुळाट! कातवी गावाच्या हद्दीतील बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजाराची चोरी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Thievish

चोरांचा सुळसुळाट! कातवी गावाच्या हद्दीतील बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजाराची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.