पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विभागाच्या पथकाने मंगळवारी (दिनांक 3 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास तळेगावात टाकलेल्या छाप्यात साडेतीन किलो गांजासह एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव स्टेशन चौकालगतच्या रस्त्यावरील एका घरावर छापा मारला असता, तेथील विशाल वसंत पलंगे याच्याकडे 3 किलो 600 ग्रॅम वजनाचा 90 हजार रुपये किमतीचा गांजा आढळला. त्याने तो सुनील शिंदे याच्याकडून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अमली पदार्थ विभाग पथकाचे पोलिस अंमलदार रणधीर माने यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. ( Three and half kilos of ganja seized in Talegaon Dabhade Action by the Narcotics Division )
फिर्यादीवरून आरोपी विशाल वसंत पलंगे आणि सुनील शिंदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विभागाचे पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले, पोलिस उपनिरीक्षक राजन महाडीक आणि सहकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद शिंपणे करत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य
– पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे लगत सर्व्हिस रोड होणार? एमएसआरडीसीचे अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन
– मावळमधील गुणवंत शिक्षकांचा जुन्नर इथे सन्मान, ‘शिक्षकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार’ – आमदार म्हात्रे