व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सांगिसे-बुधवडी ग्रामपंचायतीमध्ये बुधवडी गावातील सदस्य पदाच्या दोनही जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी तिरंगी लढत

मावळ तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. बुधवारी, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 27, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Sangise-Budhwadi-Group-Gram-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. बुधवारी, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे दुपारपर्यंत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स इथे मोठी धावपळ पाहायला मिळाली. सायंकाळपर्यंत निवडणूका असलेल्या 29 ग्रामपंचायतींचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं होतं. यावेळी मावळ तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या सांगिसे-बुधवडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 7 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या. माजी सरपंच बबन टाकळकर यांच्या पुढाकारातून बुधवडी वॉर्डातील सदस्य पदाच्या 2 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता 7 सदस्यीय ‘सांगिसे-बुधवडी’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 5 सदस्य पदासाठी आणि सरपंच पदासाठी निवडणूक रंगणार आहे. ( Sangise Budhwadi Group Gram Panchayat Election 2023 Maval Taluka )

बुधवडी वॉर्डातील 2 सदस्य बिनविरोध –
सांगिसे बुधवडी हि ग्रुप ग्रामपंचायत असून बुधवडी गावात 2 सदस्य वॉर्ड आहे. यात दोन्ही सदस्य हे बिनविरोध निवडून आलेत. येथील 2 जागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागेवर तुकाराम राजाराम टाकळकर आणि सर्वसाधारण महिला आरक्षित जागेवर सुष्मा गणेश टाकळकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सांगिसे गावातील दोन्ही वॉर्डात रंगणार निवडणूक –
सांगिसे गावातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये तीन सदस्य असून येथे एकूण 7 जण रिंगणार आहेत. पैकी सर्वसाधारण महिलांच्या दोन जागांसाठी 5 उमेदवार असून अन्य एका सर्वसाधारण जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर, सांगिसेतीलच वॉर्ड क्रमांक – 2 मध्ये दोन जागांवर 4 उमेदवार रिंगणार आहेत. तर., सरपंच पदासाठी आरक्षित अनुसुचित जाती महिला जागेसाठी एकूण 3 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी गावात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील विविध विकासकामांना प्रारंभ
– अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन
– ग्रामपंचायत निवडणूक : छाननीत अर्ज बाद का होतात? ग्रामपंचायत उमेदवारांसाठी अटी आणि पात्रता काय असतात? जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

बिअर बारचे लायसन्स काढून देतो असे सांगून एकाची 9 लाख 58 हजाराची फसवणूक; गहुंजे गावातील प्रकार

Next Post

कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड; वाचा समितीमधील सदस्यांची संपूर्ण यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kashal-Village-Maval

कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड; वाचा समितीमधील सदस्यांची संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.