व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

लांबलेली निवडणुक अखेर होणार असल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इथेही सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असून, सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 13, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील लांबणीवर पडलेल्या वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. वाकसई ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी येत्या डिसेंबर महिन्यात दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारांना मंगळवार, दिनांक 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर,वडगाव मावळ इथे दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लांबलेली निवडणुक अखेर होणार असल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इथेही सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असून, सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. मावळातील 19 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 10 ग्रामपंचायचींच्या पोटनिवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता तालुक्यातील फक्त एकाच ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. ( Election of Vakasai Gram Panchayat in Maval taluka announced )

चुकीचे आरक्षण काढल्याने आरक्षण बदलाबाबत वाकसईच्या काही ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने वाकसईची निवडणूक लांबणीवर पडली होती. वाकसई ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रखडल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली होती. खर्च वाढत असल्याने उमेदवार धास्तावले होते. अखेर आयोगाच्या वतीने वाकसई ग्रुपग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. अखेर निवडणूक प्रक्रिया मार्गी लागल्याने इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन दाखल करण्याचा दिनांक – 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर (स. 11 ते दु. 3)
अर्ज छाननी – 5 डिसेंबर
अर्ज माघारी – 7 डिसेंबर (दु. 3 पर्यंत)
चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी – 7 डिसेंबर (दु. 3 नंतर)
मतदान – 20 डिसेंबर
मतमोजणी – 21 डिसेंबर

अधिक वाचा –
– बंगळुरुमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची माळेगाव आश्रमशाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना 62 हजारांची मदत
– अवकाळीचा तडाखा! शेतकऱ्यांनी पंचनामे करुन घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करावा – आमदार सुनिल शेळके
– शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव धनवे यांचे दुःखद निधन! अंत्यविधीला जमला हजारोंचा जनसमुदाय


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर

Next Post

लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavala-Municipal-Council

लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.