व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शंकराचार्यांचा अवमान केल्याबद्दल नारायण राणेंचा निषेध, लोणावळ्यात महाविकासआघाडी रस्त्यावर । Lonavala News

'हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय?' असा प्रश्‍न विचारून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 15, 2024
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Narayan-Rane-Shankaracharya

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय?’ असा प्रश्‍न विचारून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केल्याचे सांगत, शंकराचार्यांना प्रश्‍न विचारून अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच, हिंदू धर्माचा आणि शंकाराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही करण्यात आली. लोणावळा येथेही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पुण्यात काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील बालगंधर्व चोकात आमदार रविंद्र धंगेरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पदाधिकारी यांनी आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष कल्याण काळे, शोख युनुस व पदाधिकारी यांनी क्रांती चोक येथे आंदोलन केले. लोणावळा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होईल. देशभरातून हजारो लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय, हजारो साधू-संत, सेलिब्रिटी, क्रीडापटू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण गेले आहे. असे असले तरी भारतातील चार मठांच्या (पीठ) चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर बोलताना नारायण राणे यांनी शंकराचार्यांवर टीकेचा सूर लावला होता. ( Protest of Narayan Rane for insulting Shankaracharya Agitation by Mahavikas Aghadi in Lonavala )

अधिक वाचा –
– ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ आणि ‘एचडीएफसी बँक – परिवर्तन’ मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप
– मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Vadgaon Maval
– चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप; उपेक्षित घटकाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आमदार सुनिल शेळकेंकडून विशेष अभियान


dainik maval jahirat

Previous Post

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pradhan Mantri Awas Yojana

Next Post

मावळमधील 91 गावात राबवली जाणार प्रधानमंत्री जनमन योजना; कातकरी समाजातील नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pradhan-Mantri-Janman-Yojana

मावळमधील 91 गावात राबवली जाणार प्रधानमंत्री जनमन योजना; कातकरी समाजातील नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.