पीएमआरडीए हद्दीमधील गृह प्रकल्पांमध्ये झालेली अनियमितता तसेच या प्रकल्पांद्वारे इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्यासह पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, नगरपरिषद प्रशासन अधिकारी पूनम पंडित, नगर रचनाकार सोनाली आहेर, सहाय्यक नगर रचनाकार अजिंक्य पवार तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील अनेक गृह प्रकल्पातील नागरिकांना भौतिक सुविधा दिलेल्या नसतानाही पूर्णत्वाचा दाखला मिळतो. तसेच या गृह प्रकल्पांमधून निघणारे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. याबाबत 16 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लक्षवेधी’ मांडून हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आवश्यक नियम व शिफारशी करुन त्याचा सर्वसमावेशक अहवाल शासनास सादर करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या चौथ्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ( Important News Every housing project with more than 20 flats in Maval taluka will be audited )
दिनांक 16 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत पीएमआरडीए मार्फत मावळ तालुक्यातील 20 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रत्येक गृह प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करुन ऑडिट करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित बिल्डरकडून सोसायटीतील नागरिकांना भौतिक सुविधा (पाणी,वीज,रस्ता,सांडपाणी व्यवस्था इ.) दिल्या आहेत की नाही, याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी पुढील कार्यवाहीसाठी बैठक घेण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– ‘आता सरकारला वेळ द्यायचा नाही’ म्हणत मनोज जरांगेंनी सांगितला ‘चलो मुंबई’चा प्लॅन, मावळात ‘इथे’ होणार मुक्काम । Maratha Reservation
– मावळमधील 91 गावात राबवली जाणार प्रधानमंत्री जनमन योजना; कातकरी समाजातील नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे लाभ
– शंकराचार्यांचा अवमान केल्याबद्दल नारायण राणेंचा निषेध, लोणावळ्यात महाविकासआघाडी रस्त्यावर । Lonavala News