व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापूसाहेब भेगडेंवर अजित दादांकडून नवी जबाबदारी, थेट राज्य पातळीवर काम करण्याची दिली संधी! । NCP Bapu Bhegade

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुक्यातील प्रमुख नेते, तथा अजित पवार यांचे समर्थक बापूसाहेब भेगडे यांच्यावर अजितदादांनी नवीन जबाबदारी दिली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 17, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Bapu-Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( NCP ) मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) प्रमुख नेते, तथा अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे समर्थक बापूसाहेब भेगडे ( Bapu Bhegade ) यांच्यावर अजितदादांनी नवीन जबाबदारी दिली आहे. बापू भेगडे यांना संघटनात्मक पातळीवर थेट राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बापूसाहेब भेगडे यांना मानणारा मोठा वर्ग मावळ तालुक्‍यात आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष ते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अशी त्यांची राजकीय चढती कमान आहे. सुनिल शेळके ( Sunil Shelke ) हे भाजपा सोडून राष्ट्रवादीत आले आणि आमदार झाले, यात बापूसाहेब भेगडे यांचे महत्वाचे योगदान होते. राजकीय क्षेत्रासह बापू भेगडे हे विविध सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी मंगळवार, दिनांक 16 जानेवारी रोजी बापू भेगडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली. यावेळी त्यांच्यावर पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी योगदान देण्याची, जबाबदारी दिली आहे. ( Bapu Bhegde From Maval Appointed Vice President Of NCP Maharashtra Pradesh By Sunil Tatkare Ajit Pawar )

अधिक वाचा –
– इतिहासातील सोनेरी पान : वडगावचा ऐतिहासिक तह : ‘पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला’
– दुर्गम भागातील विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे; कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट । Maval Gramin
– महत्वाचे! मावळ तालुक्यातील 20 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रत्येक गृहप्रकल्पांचे ऑडिट होणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात शनिवारी होणार ‘इंद्रायणी नदी आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता’, IPS सत्यसाई कार्तिक यांचे नागरिकांना आवाहन । Lonavala News

Next Post

ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते देहू गावात श्री देवदर्शन यात्रा समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन । Dehu News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Devdarshan-Yatra-Committee-pune

ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते देहू गावात श्री देवदर्शन यात्रा समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.