व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 जागांसाठी 94 उमेदवार इच्छुक, छाननीअंती 90 अर्ज वैध, वाचा सविस्तर

मावळ तालुक्यात सध्या खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. संघाच्या 19 जागांसाठी तब्बल 94 उमेदवारी अर्ज आले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 1, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
maval-taluka-kharedi-vikri-sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात सध्या खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुकीची (Maval Taluka Cooperative Buying and Selling Union Election 2024) धामधूम सुरू आहे. संघाच्या 19 जागांसाठी तब्बल 94 उमेदवारी अर्ज आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. कुलकर्णी यांनी दिलीये. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी (दि.30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. बुधवारी (दि. 31) दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांची छाननी झाली. दिनांक 1 ते 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत आहे. तर, 16 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप आणि 25 फेब्रुवारी रोजी मतदान व मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या 19 जागांसाठी दाखल झालेल्या 94 उमेदवारी अर्जांपैकी चार अर्ज छाननीत बाद झाले असून 90 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली. 19 जागांसाठी प्राप्त झालेल्या तब्बल 94 अर्जांमध्ये सर्वपक्षीय इच्छुकांचा समावेश आहे. अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली, त्यात ‘अ’ वर्ग मतदार संघातील तीन व भटक्या जमाती, विमुक्त जाती मतदार संघातील एक अर्ज बाद झाला व 90 अर्ज वैध ठरले. ( Maval Taluka Sahakari Kharedi Vikri Sangh Nivadnuk 2024 Pune District )

मतदारसंघ निहाय जागा व वैध अर्ज पुढील प्रमाणे –
सर्वसाधारण ‘अ’ वर्ग प्रतिनिधी गट (लोणावळा, खडकाळा, वडगाव, टाकवे बुद्रूक, तळेगाव, साळुंब्रे, शिवणे, कोथुर्णे, आंबेगाव) अशा 9 गटांतील 9 जागांसाठी 23 अर्ज,
‘ब’ वर्ग (इतर सहकारी संस्था) – 2 जागांसाठी 11 अर्ज,
‘क’ वर्ग (वैयक्तिक सभासद) – 3 जागांसाठी 34 अर्ज,
महिला प्रतिनिधी – 2 जागांसाठी 8 अर्ज,
अनुसूचित जाती जमाती – 1 जागेसाठी 5 अर्ज,
इतर मागास प्रवर्ग – 1 जागेसाठी 9 अर्ज,
भटक्या विमुक्त जाती जमाती – 1 जागेसाठी 1 अर्ज.

छाननीअंती 90 अर्ज वैध ठरलेत. आता 15 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान भटक्या विमुक्त जागी एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्याठिकाणी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. ( Maval Taluka Cooperative Buying and Selling Union Election 2024 Pune District )

अधिक वाचा –
– ‘अहमदनगर वकील दांपत्य हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी’, वडगाव लीगल बार असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन । Ahmednagar Lawyer Couple Murder Case
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा । Pimpri Chinchwad RTO
– डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी असा लौकिक असलेले पंकज देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती! Pankaj Deshmukh


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलनाची हाक! NCP Sharad Pawar Faction

Next Post

‘दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते, विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव केल्यास यश सहज साध्य करता येईल’ – पंतप्रधान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
narendra-modi-pariksha-pe-charcha

'दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते, विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव केल्यास यश सहज साध्य करता येईल' - पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.