व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तालुक्याचं गाव पण विजेचा बारा महिने लपंडाव’, वडगाव शहरातील वीज विषयक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे महावितरणला निवेदन । Vadgaon Maval

निवेदन देताना व्हॅलेंटाईन डे चे प्रतिक म्हणून गुलाबपुष्प महावितरण अधिकाऱ्यांना देऊन प्रेमाच्या शब्दात त्यांना पदाधिकाऱ्यांनी आपले निवेदन सादर केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 14, 2024
in लोकल, शहर
Mahavitaran-Vadgaon-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ शहरात वीज विषयक समस्यांनी सामान्यांना अक्षरशः हैराण करून ठेवले आहे. वेळीअवेळी विजपुरवठा खंडित होणे ही तर सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात बुधवारी वडगाव शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील विजपुरवठा दिवसभर खंडीत झाला होता. शहरातील नागरिकांच्या वीज पुरवठ्याबाबत असलेल्या समस्या लक्षात घेत आज, बुधवार (दि. 14) रोजी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने विजेच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वडगाव येथील कार्यालयात निवेदन दिले. वडगाव शहरातील विजेचा सततचा लपंडाव, प्रलंबित असलेली महावितरणची कामे आणि काही मागण्यांबाबत राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी महावितरण शाखा अभियंता कार्यालयात जाऊन निवेदन दिले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

निवेदन देताना व्हॅलेंटाईन डे चे प्रतिक म्हणून गुलाबपुष्प महावितरण अधिकाऱ्यांना देऊन प्रेमाच्या शब्दात त्यांना पदाधिकाऱ्यांनी आपले निवेदन सादर केले. महावितरणचे अधिकारी मनोज नेमाडे आणि कनिष्ठ अभियंता राहुल लकडे यांनी हे निवदेन स्विकारले. यावेळी विशाल वहिले यांनी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याबाबत तोंडी तक्रारही केली. (NCP Leader gave Letter to Mahavitaran Officer Regarding Electricity Problems In Vadgaon Maval)

निवेदन देताना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव पंकज भामरे, वडगाव शहर राष्ट्रवादी पदवीधर सेल अध्यक्ष सौरभ सावले, शैलेश खैरे, अभिषेक ढोरे उपस्थित होते. वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक 6 व 7 मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, मल्हार रेसिडेन्सी, एकविरानगर कॉलनी, लक्ष्मी नगर कॉलनी आणि परिसरातील नागरिकांना दररोज विद्युत पुरवठा खंडित होऊन नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांना कळकळीने सांगण्यात आले.

खालील समस्या मांडत मागण्या करण्यात आल्या –
1. वडगाव मावळ स्मशानभूमीतील जो डीपी बॉक्स आहे तो नादुरुस्त अवस्थेत आहे तो बॅाक्स बदलावा.
2. अनेक ठिकाणी खांबावरील तारांना झोळ निर्माण झाल्यामुळे वारंवार फ्युज जात आहे.
3. वडगांव स्मशानभूमी जवळील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी.
4. उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्म गरम होऊन त्यातनं ऑइल बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण त्याला ट्रान्सफॉर्मर कव्हर बसून घ्यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात गुरूवारी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन । Maval News
– तळेगाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान । Talegaon Dabhade
– पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna


dainik maval jahirat

Previous Post

‘अर्थ समजून घेत प्रेम व्यक्त करुया…’, व्हॅलेंटाईन डे बद्दल तरुणाईच्या ‘मन की बात’ नक्की वाचा । Valentine’s Day 2024

Next Post

भव्य बैलगाडा शर्यत.. कुस्तीचा जंगी आखाडा आणि मनोरंजनाची मेजवानी! टाकवे गावच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Takve-Budruk-Village-Yatra

भव्य बैलगाडा शर्यत.. कुस्तीचा जंगी आखाडा आणि मनोरंजनाची मेजवानी! टाकवे गावच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.